इस्त्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनची राजधानी बेरूतवर गुरुवारी पहाटे हल्ला केला.  (Image source- X)
आंतरराष्ट्रीय

८ सैनिकांच्या मृत्यूनंतर 'इस्रायल'चा बेरूतवर हल्ला; ६ ठार, 'फॉस्फरस बॉम्ब'चा वापर?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क

इस्त्रायलने पुन्हा एकदा लेबनॉनची राजधानी बेरूतवर गुरुवारी पहाटे हल्ला केला. इस्त्रायलने मध्य बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात (Israel-Hezbollah war) किमान ६ लोक ठार झाले. २००६ नंतर इस्त्रायलने प्रथमच बेरूतच्या मध्य भागावर हवाई हल्ला केला. इस्त्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये १ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हिजबुल्लासोबत युद्ध झाल्यापासून सुमारे १० लाख लोक विस्थापित झाले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, हिजबुल्ला सोबत सीमेजवळ सुरु असलेल्या संघर्षात इस्रायलचे ८ सैनिक मारले गेले. सीमेपलीकडून हल्ले सुरू केल्यानंतरची इस्रायलची ही पहिली जीवितहानी आहे. त्यानंतर इस्रायलने गुरुवारी मध्य बेरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. ज्यात किमान ६ लोक ठार झाले.

फॉस्फरस बॉम्बचा वापर?; बेरूतवर रात्रभर १७ हवाई हल्ले

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने या जीवितहानीची पुष्टी केली आहे. मध्य बेरूतमधील अपार्टमेंट इमारतीवर झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात किमान सहा जण ठार झाले. तर ११ जण जखमी झाले आहेत. या हवाई हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र मुख्यालय, पंतप्रधान कार्यालय आणि संसदेपासून जास्त दूर नसलेल्या बाशौरा जिल्ह्यातील एका निवासी बहुमजली इमारतीतील एका अपार्टमेंटला आग लागली. या हल्ल्यानंतर रहिवाशांना पांढऱ्या सल्फरसारखा वास आला. तसेच लेबनॉनच्या सरकारच्या नॅशनल न्यूज एजन्सी (NNA) ने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय बंदी असलेल्या फॉस्फरस बॉम्बचा वापर केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत बेरूतवर रात्रभर एकूण १७ हवाई हल्ले झाले, असे NNA ने वृत्तात म्हटले आहे.

इस्रायलच्या ८ सैनिकांचा मृत्यू

इस्त्रायली लष्कराकडून (Israeli military) सांगण्यात आले आहे की, बुधवारी दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या लढाईत त्यांच्या ८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT