तेल अविव वृत्तसंस्था : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलमधील अपहृत बालकांचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. एका हातात बंदूक आणि दुसऱ्या हातात अपहृत बालके असल्याचे या व्हिडीओमधून दिसून येते. (Israel-Hamas war )
लहान बालकांना पाणी पाजून बिस्मिल्लाह म्हणायला लावले जात असल्याचेही या व्हिडीओतून दिसून येते. हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्वायलवर ५ हजार रॉकेट दान हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ इस्त्रायलने जारी केला आहे. बालकांच्या माता- पित्यांची हत्या केली आहे. दहशतवाद्यांच्या हाती एका अर्भकासह चार ते सहा वर्षांची दोन बालके असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामध्ये लहान बालके भीतीपोटी आक्रोश करीत असून, दहशतवाद्यांच्या हाती एक- ४७ ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असल्याचेही यामधून दिसून येते. (Israel-Hamas war )
संबंधित बातम्या :
पश्चिम बंगालमधील जमियत-ए- उलेमा या संघटनेने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. इस्रायलच्या हल्ल्याच्या या संघटनेने निषेध केला. मौलाना सिद्दीकुला चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प. बंगालमध्ये रॅली काढण्यात आली. स्वतंत्र पॅलेस्टाईनच्या मागणीला आमचा पाठिंबा असून, आम्ही पॅलेस्टाईनला सहकार्य करण्यास तयार आहोत. युद्धाऐवजी चर्चेने तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, मुंबईमध्येही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. (Israel-Hamas war )