america vs iran - trump vs khamenie Pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran Us War | झुकेगा नहीं... म्हणत इराणचा ट्रम्प यांना इशारा; शरणागती विसरा, नुकसान अमेरिकेचंच होणार - खामेनींनी ठणकावलं...

Iran Us War | इराण अमेरिकेला भिडणार! इस्रायलविरूद्धच्या संघर्षाला नवे वळण

Akshay Nirmale

Iran Us War Israel

तेहरान : इस्रायल-इराण संघर्ष पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरण येण्याचा सल्ला दिला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.

खामेनी म्हणाले की, "इराणी राष्ट्राला शरण जाण्यास सांगणे हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. आम्ही कधीच कोणाच्याही हल्ल्यांपुढे शरण जाणार नाही. हीच इराणी जनतेची विचारसरणी आणि आत्मा आहे."

अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला शरण येण्याचे आवाहन करत काही कठोर विधाने केली होती. त्यावर उत्तर देताना खामेनी म्हणाले की, "अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष धमक्या देतो. आपल्या हास्यास्पद आणि अहंकारी भाषणांतून तो इराणी जनतेला शरण येण्यास सांगतो. अशा धमक्या त्या लोकांना द्या, जे धमक्यांना घाबरतात. इराणी राष्ट्र अशा धमक्यांनी घाबरत नाही."

अमेरिकन हल्ल्यांचे गंभीर आणि अपरिमित परिणाम होतील...

खामेनी यांनी स्पष्ट शब्दांत अमेरिकेला सावध करत सांगितले की, "जर अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर त्याचे गंभीर आणि अपरिमित परिणाम भोगावे लागतील." त्यांनी जगाला सांगितले की, इराण कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणास तोंड देण्यासाठी सज्ज आहे आणि तो कधीही झुकणार नाही.

इराण-इस्रायल संघर्षाला 6 दिवस...

दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून इस्रायल-इराण संघर्ष सुरू आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानमधील "डिस्ट्रिक्ट 18" मध्ये हल्ला केला असून, येथे इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित विद्यापीठ होते.

दरम्यान, इस्रायली लष्कराने सांगितले की, इराणकडून दोन क्षेपणास्त्रांच्या फेऱ्या इस्रायलवर डागण्यात आल्या असून, तेल अवीव शहरात स्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले. इराणने Fattah-1 नावाचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागल्याचा दावा केला आहे.

रशियन आणि चिनी नागरिकांचे स्थलांतर

रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात आले असून, बऱ्याच जणींना इजिप्तमार्गे मायदेशी पाठवण्यात आले. चीननेही 791 नागरिकांना इराणमधून सुरक्षित भागात हलवले असून, आणखी 1000 लोक बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या 5 व्या फ्लीटमधील जहाजे खबरदारीचा भाग म्हणून बहारीनच्या मुख्य बंदरातून हलवण्यात आली आहेत.

मानवी हक्क संघटनेचा दावा – 585 मृत्यू, 1326 जखमी

Human Rights Activists या वॉशिंग्टनस्थित संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 585 लोकांचा मृत्यू झाला असून, 1326 जण जखमी आहेत. यामध्ये 239 सामान्य नागरिक आणि 126 सुरक्षा अधिकारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT