Fact Check | इराणचा अमेरिकेसाठी 'हवेचा' सापळा ?  
आंतरराष्ट्रीय

Fact Check | इराणचा अमेरिकेसाठी 'हवेचा' सापळा? हवेने भरलेल्या फुग्यांची शस्त्रास्त्रे दाखवून अमेरिकन लष्कराची दिशाभूल? सत्‍य काय?

Inflatable Decoys अमेरिकेचे होत आहे लाखो डॉलर्सचे नुकसान सोशल मिडीयावरील दाव्यात तथ्य किती

Namdev Gharal

Iran - America war इराण आणि अमेरिका -इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणने 'इन्फ्लेटेबल' (Inflatable) म्हणजेच हवेने भरलेले डमी टँक, विमाने आणि क्षेपणास्त्रे तैनात केल्याचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रकरणातील तथ्य काय आहे, इराण असे खरच करत आहे का, यामुळे अमेरिकेची अत्‍याधुनिक प्रणाली फेल जात आहे का? हवेने भरलेली विमाने, हेलिकॉप्टर, टँक यांच्यावर बॉम्बवर्षाव करुन अमेरिका आपले नुकसान करुन घेत आहे का?

काय असतात हवेने भरलेली खेळणी

शत्रूची दिशाभूल करण्यासाठी इराण चक्क 'हवेने भरलेली' खेळणी वापरत आहेत याला Inflatable Decoys असे म्हटले जाते यामध्ये, विमाने, टँक आणि क्षेपणास्त्रे हवा भरुन तयार केले जात असल्याचे व्हिडीओ आपण पाहतो. यावर ही इराणची एक मोठी लष्करी रणनीती असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहे हे 'इन्फ्लेटेबल' तंत्रज्ञान?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये काही लष्करी जवान अवघ्या काही मिनिटांत हवेच्या साहाय्याने हुबेहूब लढाऊ विमान आणि रणगाडा उभा करताना दिसत आहेत. दुरून पाहिल्यास ही शस्त्रे खरी वाटतात, मात्र प्रत्यक्षात ती केवळ रबर किंवा कापडाचे फुगे असतात. उपग्रह आणि ड्रोन्सच्या नजरेतून खरी शस्त्रास्त्रे लपवण्यासाठी आणि शत्रूचे लक्ष विचलित करण्यासाठी याचा वापर केला जातो. शस्त्रूचे लक्ष विचलीत करणाऱ्या या तंत्रज्ञानाला इन्फ्लेटेबल' तंत्रज्ञान असे म्हणतात.

Reuters, Forbes आणि संरक्षणविषयक माहिती देणाऱ्या The War Zone सारख्या जागतिक माध्यमांनी इराणच्या या रणनीतीवर अनेकदा प्रकाश टाकला आहे. इराणने त्यांच्या 'बंदर अब्बास' बंदरावर अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेची (Aircraft Carrier) हुबेहूब लाकडी आणि रबरी प्रतिकृती तयार केली होती. इस्रायल आणि अमेरिकेच्या उपग्रहांना आणि क्षेपणास्त्रांना चकवा देण्यासाठी ही इराणची रणनीती असल्याचे म्हटले जात आहे.

अमेरिकेला बसत आहे आर्थिक फटका?

इस्रायल किंवा अमेरिकेने डागलेले एक क्षेपणास्त्र लाखो डॉलर्सचे असते. जर हे महागडे क्षेपणास्त्र इराणच्या स्वस्त रबरी टँकवर पडले, तर शत्रूचे मोठे आर्थिक नुकसान होते. उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या फोटोंमध्ये शत्रूला असे वाटते की इराणने अमुक ठिकाणी मोठी फौज तैनात केली आहे, प्रत्यक्षात तिथे फक्त 'फुगे' असतात. यामुळे शत्रूची खरी रणनीती चुकते रॉयटर या वृत्त संस्थेने म्हटले आहे की इराणचे 'रिव्होल्युशनरी गार्ड्स' (IRGC) Islamic Revolutionary Guard Corps अशा बनावट शस्त्रांचा वापर सरावासाठी आणि शत्रूला फसवण्यासाठी करतात. पण व्हायरल व्हिडीओतील दाव्यांना यामुळे पुष्टी मिळत नाही

व्हिडीओतील दावे कितपत खरे

तांत्रिकदृष्ट्या खरे आहे. इराणच नव्हे, तर रशिया आणि युक्रेन देखील सध्याच्या युद्धात या तंत्राचा वापर करत आहेत. इराणकडे 'इन्फ्लेटेबल' लष्करी साधनांची मोठी तुकडी आहे. एक युक्ती म्हणून डिकॉयचा वापर केला आहे. यामध्ये बनावट टँक, विमाने, जहाजे किंवा वास्तविक लक्ष्यांसारखे दिसण्यासाठी डिझाइन केलेली इतर लष्करी उपकरणे समाविष्ट असू शकतात. पण व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवलेले सत्‍य असण्याला कोणताही पुरावा नाही आहे

इंडीया टुडे या वृत्तवाहिनेने म्हटले आहे की रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, दोन्ही बाजूंनी डिकॉय युक्त्या वापरल्याचे वृत्त अनेक मोठ्या वृत्तसंस्थानी दिले आहेत. रशियाने ड्रोन किंवा उपग्रह लक्ष्यीकरणाची दिशाभूल करण्यासाठी पेंट केलेले विमान सिल्हूट आणि ढिगाऱ्यापासून बनवलेले बनावट विमाने तैनात केल्याचा आरोप आहे, तर युक्रेनने रशियाला महागड्या क्षेपणास्त्रांचा नाश करण्यासाठी डमी तोफखाना प्रणाली वापरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT