Iran-US Talks Fail: Trump Issues Warning Naval Blockade
वॉशिंग्टन: इराण आणि अमेरिका यांच्यात इस्लामाबाद येथे सुरू असलेली चर्चा फिस्कटली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची पुन्हा एकादा इराणला इशारा दिला आहे. त्यांच्या विधानामुळे इराणच्या महसुलाचा मुख्य स्रोत असलेल्या तेल निर्यातीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात तब्बल २१ तास चर्चा झाली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. वान्स यांनी या चर्चेचे नेतृत्व केले. "आम्ही इराणसमोर आमचा अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव ठेवला होता, मात्र इराणने आमच्या अटी मान्य केल्या नाहीत," असे वान्स यांनी स्पष्ट केले. इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखणे हेच अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचाही त्यांनी पुन्नरुच्चार केला.
चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने आक्रमक झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
इराण न झुकल्यास राष्ट्राध्यक्षांकडे नाकेबंदीचे 'ट्रम्प कार्ड' असे आहे. इराणच्या उत्पन्नाचा कणा असलेल्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अमेरिकेने याच प्रकारच्या नौदल नाकेबंदीचा वापर केला होता, त्याच धर्तीवर आता इराणची कोंडी करण्याची योजना असल्याचे ट्रम्प यांच्या पोस्टनंतर स्पष्ट झाले आहे.
रिपोर्टनुसार, अमेरिकेने आधीच या भागात आपली नौदलाची शक्ती तैनात केली आहे. यामध्ये 'यूएसएस जेराल्ड फोर्ड' आणि 'यूएसएस अब्राहम लिंकन' यांसारख्या बलाढ्य विमानवाहू युद्धनौकांचा समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ रेबेका ग्रांट यांच्या मते, "होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या जागतिक तेल मार्गावर अमेरिकन नौदल पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकते. तिथून होणारी जहाजांची ये-जा रोखणे अमेरिकेसाठी आता सहज शक्य आहे." मात्र, ही नाकेबंदी नेमकी कधी आणि कशी लागू केली जाईल, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
केवळ नाकेबंदीच नव्हे, तर इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे पर्यायही अमेरिकेकडे खुले आहेत. इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र असलेल्या 'खार्ग बेट' नियंत्रण मिळवण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. मुत्सद्देगिरीचे प्रयत्न थांबल्याने आता अमेरिका आर्थिक आणि लष्करी दाबाचा वापर करण्याची शक्यता अधिक कठोर करण्याची शक्यता आहे.