iran targets ivanka trump pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran Targets Ivanka Trump: इराणच्या अल-सादीचे मोठं धाडस केलं... थेट ट्रम्प यांच्या मुलीच्या जीवाशी खेळ; कशाचा बदला घेणार होता?

Anirudha Sankpal

Iran Targets Ivanka Trump: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इराणच्या इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून प्रशिक्षण घेतलेला दहशतवादी इवांका ट्रम्पला मारण्याचे पूर्ण प्लॅनिंग केलं होतं.

द पोस्ट वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी सहा वर्षापूर्वी अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले आपले गुरू इराणी सैन्याचे कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेणार होता. तपास यंत्रणांनी सांगितलं की इवांका ट्रम्प यांची हत्या करण्याचे प्लॅनिंग करणाऱ्या दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचे नाव मोहम्मद बाकर साद दाऊद अल सादी असं आहे. तो ३२ वर्षाचा असून तो इराणचा नागरिक आहे.

सुमेमानींना मानत होता गुरू

सहा वर्षापूर्वी बगदादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने एक मोठे ऑपरेशन लाँच केले होते. त्यात इराणचे वरिष्ठ लष्कर कमांडर कासिम सुलेमानी यांना ठार करण्यात आलं. अल-सादी या सुलेमानी यांना आपला गुरू मानत होता. तेव्हापासूनच ट्रम्पच्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करण्याच्या इराद्यात होता.

आरोपी अल-सादीने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्या कुटुंबीय विशेषकरून त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांना जीवे मारण्याची शपथ घेतली होती. तपासादरम्यान तपास यंत्रणांनी अल सादीच्या जवळ फ्लोरिडामधील इवांका ट्रम्प यांच्या आलीशान घराची पूर्ण ब्लूप्रिंट हस्तगत केले. तो अनेक दिवसांपासून इवांका यांच्या घराची रेकी करत होता.

आपल्याला इवांकाला मारायला हवं

वॉशिंग्टनमध्ये इराकी दूतावासातील माजी मिलिट्री अटॅची एतिफाद कनबर यांनी या दहशतवाद्याच्या इराद्याबाबत एक मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'कासिम सुलेमानी यांची हत्या झाल्यानंतर अल सादी लोकांना सांगत होता की आता आपल्याला इवांका ट्रम्प यांना मारायला हवं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपूर्ण घराण्याला त्याच पद्धतीनं जाळून मारलं पाहिजे ज्या प्रमाणे आमच्या घराला त्यांनी उद्ध्वस्त केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT