Donald Trump Warns Iran
वॉशिंग्टन/तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा गर्भित इशारा दिला आहे.
अमेरिका इराणवर संपूर्ण शक्तीने प्रहार करेल. जगाने यापूर्वी कधीही असा हल्ला पाहिली नसेल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला गर्भित इशारा दिला आहे.
दुसरीकडे, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांच्या खात्म्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इस्रायली लष्कराचे अभिनंदन केले आहे. "ज्याने इस्रायलचा विनाश करण्याचा प्रयत्न केला, त्याचाच आता विनाश झाला आहे," असे कात्झ यांनी 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "न्याय झाला असून 'दुष्ट शक्तींच्या अक्षाला' (Axis of Evil) वर्मी घाव बसला आहे," असेही त्यांनी नमूद केले. इस्रायल पूर्ण शक्तीनिशी आपली कारवाई सुरूच ठेवेल, असे सांगत त्यांनी सरकारची आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.
इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशात आज तात्पुरत्या 'नेतृत्व परिषदे'ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी दिली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने लारीजानी यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून, खामेनी यांच्या पश्चात सत्तासंघर्ष टाळण्यासाठी ही तातडीची पावले उचलली जात असल्याचे समजते.
इस्त्रायल आणि अमेरिकेने रविवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला असून, खामेनेई यांचा उल्लेख "इतिहासातील अत्यंत क्रूर व्यक्ती" असा केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांत युद्धाचा भडका उडाला असून इराणने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, शनिवारी इस्त्रायली लढाऊ विमानांनी तेहरानमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. खमेनी यांचे कार्यालय असलेल्या परिसराजवळच हे स्फोट झाले. ८६ वर्षीय खमेनी गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. इस्त्रायली संरक्षण मंत्री इस्त्रायल कात्झ यांनी या कारवाईचे वर्णन "धोका मुळासकट उपटून टाकणे" असे केले आहे.