प्रातिनिधिक छायाचित्र.  
आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz firing | हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार

Strait of Hormuz firing | इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींनी 'टेलिग्राम'वर पोस्‍ट करत दिला अमेरिकेला इशारा

पुढारी वृत्तसेवा

Iran Opens Fire on Commercial Ships in Strait of Hormuz

तेहरान: इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा आपले लष्करी नियंत्रण कडक केल्याची घोषणा केल्यानंतर, शनिवारी ही सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक स्रोतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्‍यान, या गोळीबार प्रकरणी अमेरिकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

इराणचे नौदल शत्रूंचा पराभव करण्यासाठी सज्ज : मोजतबा खामेनी

इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खमेनी यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर एक आव्हानात्मक संदेश पोस्ट करत म्हटले आहे की, "इराणचे नौदल आपल्या शत्रूंचा 'पराभव करण्यासाठी सज्ज आहे."

प्रथमच आठ टँकरचा ताफा सामुद्रधुनीतून जाताना दिसला

सागरी ट्रॅकर्सनी दिलेल्या माहितीनुसार, सात आठवड्यांपूर्वी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून जहाजांची ही पहिलीच मोठी हालचाल होती. सुरुवातीला आठ टँकरचा ताफा या सामुद्रधुनीतून जाताना दिसला होता. मात्र, अमेरिकेने इराणच्या बंदराची नाकेबंदी सुरूच ठेवल्याने, इराणने जगातील एकूण तेल व्यापाराच्या पाचव्या भागासाठी महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावर पुन्हा कडक लष्करी निर्बंध लादले आहेत.

ट्रम्प यांचे सूचक विधानाने युद्धविराम संपण्याची भीती

काही तासांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत "काही चांगल्या बातम्या" असल्याचे सूचित केले होते, परंतु त्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला. तसेच, दोन आठवड्यांचा युद्धविराम बुधवारी संपत असून, तोपर्यंत शांतता करार न झाल्यास पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या कारवायांमुळे कारवाई करावी लागली : इराण

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात गुरुवारी अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या १० दिवसांच्या स्वतंत्र युद्धविरामानंतर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी तात्पुरती खुली करण्याची घोषणा केली होती. परंतु, शनिवारी इराणच्या सशस्त्र दलाच्या कमांडने सांगितले की, "अमेरिकेकडून होणारे वारंवार उल्लंघन आणि नाकेबंदीच्या नावाखाली चाललेल्या 'चाचेगिरी'मुळे या सामुद्रधुनीतील वाहतूक पुन्हा इराणच्या कडक लष्करी नियंत्रणाखाली आणली आहे. इराणच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, चर्चेनंतर मर्यादित तेल टँकर्स आणि व्यावसायिक जहाजांना मार्ग देण्यास इराणने "सदिच्छेपोटी" मान्यता दिली होती. मात्र, अमेरिकेच्या कारवायांमुळे तेहरानला या धोरणात्मक जलमार्गावर पुन्हा नियंत्रण मिळवणे भाग पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT