आंतरराष्ट्रीय

Ali Larijani attack | इराणला मोठा धक्का? सुरक्षा प्रमुख अली लारीजानींचा खात्मा केल्‍याचा इस्रायलचा दावा

Iran Israel conflict | अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या लढाईत "ठाम" असल्याचे संदेशानंतर दुसर्‍या दिवशी करण्‍यात आले लक्ष्‍य

पुढारी वृत्तसेवा

Iran Israel conflict

जेरुसलेम: हवाई हल्ल्यात इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी ठार झाले आहेत, असा दावा इस्रायली प्रसारमाध्यमांनी केला आहे. 'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव लारीजानी यांच्‍यावर हल्‍ला झाला आहे मात्र ते ठार झाले की जखमी, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या लढाईत 'ठाम' असल्याचh संदेश लारीजानी यांनी मुस्लिम जगाला दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर हल्ल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्‍यान, इराणने लारीजानी यांच्यावर झालेल्या कोणत्याही हल्ल्याच्या वृत्तावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लारीजानी यांच्‍या हवाल्‍याने निवेदन प्रसिद्ध

दरम्यान, इराणचे सरकारी माध्यम 'प्रेस टीव्ही'ने लारीजानी यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे की, "४७ वर्षांपूर्वी इराणच्या इस्लामिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असताना, पहलवी राजवटीच्या पंतप्रधानांनी दावा केला होता की, रस्त्यावर घोषणाबाजी करणाऱ्या गर्दीचा आवाज खरा नसून ती टेप रेकॉर्डिंग आहे! आता अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प इराणमधील लाखो लोकांच्या अमेरिका-विरोधी आणि इस्रायल-विरोधी निदर्शनांबाबत म्हणत आहेत की, ही चित्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे तयार केलेली आहेत."

इराणचा संघर्षाचा निर्धार

तेहरान अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या लढाईत "ठाम" असल्याचे संदेश लारीजानी यांनी मुस्लिम जगाला दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावरील हल्ल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. इराणवर हल्ला झाला असताना मुस्लिम बहुसंख्य देशांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याबद्दल लारीजानी यांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारी त्यांनी म्हटले होते की, "इराणवर अमेरिका आणि झिओनिस्टांनी विश्वासघातकी आक्रमण केले. हे आक्रमण चर्चेच्या काळात झाले असून इराणचे तुकडे करणे हा त्यामागचा उद्देश होता. या आक्रमणामुळे इस्लामिक क्रांतीच्या महान नेत्यासह अनेक नागरिक आणि लष्करी कमांडरना वीरमरण आले आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT