Iran reaches Indian Ocean pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran reaches Indian Ocean: इराण हिंदी महासागरापर्यंत पोहचलं; ४००० किमी लांब अमेरिका, ब्रिटनच्या बेसवर प्रहार

Anirudha Sankpal

Iran reaches Indian Ocean 2026: इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्ध गेल्या तीन आठव्यापासून सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायल इराणच्या लष्करी अन् रणनैतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे. इस्त्रायलने इराणच्या अनेक लष्करी नेतृत्वाचा खात्मा केलाय. मात्र इराण काही माघार घेत नाहीये.

त्यांनी देखील इस्त्रायलच्या अनेक शहरांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ला चढवला असून अमेरिकेचे मध्य पूर्व आशियातील अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत. आता इराणने मोठा पल्ला गाठत हिंदी महासागरात असलेल्या अमेरिकेच्या आणि ब्रिटनच्या लष्करी तळांवर लांब पल्ल्याची मिसाईल दागली आहेत.

इराणनं हल्ल्याचे रेडियस वाढवला

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्ट नुसार इराणने शनिवारी हिंदी महासागरातील अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त लष्करी बेस डिएगो गार्सियावर दोन मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाईल सोडले. सध्या मध्यपूर्व आशियात युद्धाची धग सर्वाधिक जाणवत आहे.

मात्र तिथून लांब असलेल्या लष्करी तळांवर इराणने हल्ला करणं ही दुर्मिळ गोष्ट होती. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार इराणची ही दोन्ही मिसाईल आपल्या लक्षापर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली आहे. मात्र इराणच्या या प्रयत्नाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.

ट्रम्प यांची समाप्तीच्या दिशेने कूच?

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही आमच्या लक्ष्याच्या अगदी जवळ आहोत असे म्हणत हा संघर्ष लवकरच संपुष्टात येण्याचे संकेत दिले. मात्र त्यांनी सीज फायरची कोणतीही शक्यता नाकारली. ट्रम्प महत्वाची घोषणा केली. अमेरिका मध्य पूर्व आशियात आपल्या लष्करी उद्दिष्टाच्या अगदी जवळ आहे.

आपली लष्करी मोहीम संपवण्याकडे आम्ही वाटचाल करत आहोत. मात्र सीज फायर होणार नाही तर पुढच्या लक्ष्यांबाबत रणनिती ठरवली जाणार आहे असं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं.

दुसरीकडं अमेरिकेने इराणच्या तेलाबाबत मोठा निर्णय गेतला आहे. अमेरिकेने इराणच्या तेलावरील बंदी ३० दिवसांसाठी शिथील केली आहे. अमेरिकेने इराणच्या तेलाचा पुरवठ्याचा मार्ग मोकळा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT