पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदोल्हियान यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी ( दि. १९) अपघात झाला होता. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष डोंगराळ भागात सापडले असून ते पूर्णतः जळून खाक झाले आहे. तर हेलिकॉप्टरच्या अपघातस्थळी कोणीही वाचलेले सापडलेले नाही, अशी पुष्टी इराणच्या स्टेट मीडियाने सोमवारी केली.
"घटनास्थळी हेलिकॉप्टरमधील प्रवासी अद्याप जिवंत असल्याची कोणतीही चिन्हे दिसून आलेली नाहीत," असे इराणच्या अधिकृत सरकारी टीव्हीने म्हटले आहे. प्रतिकूल हवामान असतानाही डोंगराळ प्रदेशात काही तास शोध घेतल्यानंतर बचाव पथकांना अपघातग्रस्त हेलिकॉप्टर सापडले. हे हेलिकॉप्टर पूर्णपणे नष्ट झाले आहे. या अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले आहे, असे एका अधिकाऱ्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
रविवारी हे हेलिकॉप्टर देशाच्या उत्तर-पश्चिम पर्वतीय भागातील जोल्फामध्ये कोसळले. रईसी आणि इतर काहीजण इराणच्या अझरबैजानच्या सीमेवरील दौरा संपवून परतत असताना ही घटना घडली.
इराण सरकारची अधिकृत वृतसंस्था IRNA ने सोमवारी पहाटे हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळाचे फुटेज जारी केले. त्यात हिरव्या पर्वत रांगेतील एका उंच दरीत हेलिकॉप्टर कोसळलेले दिसते. येथील जवानांनी स्थानिक भाषेत बोलताना सांगितले की, "ते तिथे आहे, आम्हाला ते सापडले आहे."
थोड्याच वेळात, सरकारी टीव्हीने वृत्त दिले की, "हेलिकॉप्टरमधील कोणीही वाचल्याचे दिसून आलेले नाही." हेलिकॉप्टरमध्ये एकूण ९ लोक होते. त्यात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, अब्दुल्लाहियान, तीन इराणी अधिकारी, एक इमाम आणि सुरक्षा दलाच्या सदस्यांचा समावेश होता, असे वृत्त CNN ने इराणी मीडियाचा हवाल्याने दिले आहे. तीन अधिकाऱ्यांमध्ये एक पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमाती होते.
हेलिकॉप्टर दुर्घटदाट धुके आणि प्रचंड थंडीनेनंतर दाट धुके आणि प्रचंड थंडी असलेल्या प्रतिकूल हवामानात पूर्व अझरबैजान प्रांतात रात्रभर आणि दिवसभर शोधकार्य सुरू होते. तुर्कस्तानच्या 'अकिंसी' ड्रोनला बचावकार्यात मदत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याने हेलिकॉप्टरच्या अवशेषाचा शोध घेतला, असे वृत्त द टेलिग्राफने दिले आहे. एका ठिकाणी काही तरी जळत असलेल्या 'ताविल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात बचावपथक पाठवण्यात आले, असे इराणी मीडियानी म्हटले आहे. तुर्की ड्रोनने टिपलेले दृश्य इराणी अधिकाऱ्यांशी शेअर केले आहे.
तुर्की व्यतिरिक्त रशियानेदेखील शोध मोहिमेत मदत करण्यासाठी विशेष विमान आणि ५० बचावकर्ते घटनास्थळी पाठवण्याची योजना आखली आहे. आर्मेनियामधून दोन विशेष रशियन हेलिकॉप्टर्स घटनास्थळी पाठवली जाणार आहेत, असे IRNA ने वृत्तात म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या इराणच्या मदतीसाठी आदेश दिले आहेत.
हे ही वाचा :