US Iran Hormuz Blockade pudhari
आंतरराष्ट्रीय

US Iran Hormuz Blockade: ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O)".... इराणचं गणिताचं इक्वेशन; अमेरिकेला दिली वॉर्निंग; याचा नेमका अर्थ काय?

Anirudha Sankpal

US Iran Conflict Hormuz Blockade: इराणचे संसदीय अध्यक्ष मोहम्मद घालिबफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची थट्टा करत त्यांना इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीमधून येणाऱ्या जाणाऱ्या जहजांना ब्लॉक करणार अशी धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर घालिबफ यांनी ट्रम्प प्रशानसाला अमेरिकेतील गॅसच्या किंमती वाढतील अशा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी व्हाईट हाऊसच्या शेजारच्या भागातील पेट्रोल प्राईसची एक इमेज शेअर केली. त्यांनी अमेरिकेतील लोकं या किंमतींना लकरच मिस करायला लागतील असा खोचक इशारा देखील दिला.

एक्सवरील पोस्ट चर्चेत

घलिबफ यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली. त्यांनी, 'सध्याच्या पेट्रोल पंपावरील किंमतींचा आनंद घ्या. मात्र कथित ब्लॉकेडमुळे लवकरच गॅस साटी ४ ते ५ डॉलर हा दर नॉस्टेल्जिक होणार आहे.'

घलिबफ यांनी "ΔO_BSOH>0 ⇒ f(f(O))>f(O)" हे गणिताचे एक इक्वेशन देखील शेअर केलं. त्याच्या जोडीला त्यांनी अमेरिकेच्या गॅस प्राईसचा एक गुगल मॅप देखील शेअऱ केला. तसंच अमेरिकेतील ग्राहकांना भविष्यातील भाववाढीबाबत इशारा देखील दिला.

गणिती इक्वेशनचा काय आहे अर्थ?

एका एक्स युजरनुसार हे गणिती इक्वेशन हे जर होर्मुझ ब्लॉकेडची तीव्रता वाढली तर (Delta O_{BSOH}>0) त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये केवळ साधी वाढ न होता, ती चक्रवाढ पद्धतीने आणि अत्यंत वेगाने वाढेल. थोडक्यात सांगायचे तर, ही वाढ एकास-एक प्रमाणात नसून ती अनेक पटींनी जास्त असेल.

या गणिती इक्वेशनचे आणि घलिबफ यांच्या ट्विटचा अर्थ हा 'जर पुरवठा कमी झाला तर किंमती वाढतील किंमत वाढीचा दबाव अजूनच भाववाढ घडवून आणेल. पहिला धक्का हा किमंत वाढीचा असेल. त्यानंतर त्याची धक्कादायक प्रतिक्रिया म्हणून अजूनच भाववाढ होईल. त्यामुळं आता कमी किंमती आहेत त्याचा आनंद घ्या.' असा असेल.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची नेव्ही ही होर्मुझमधून ये - जा करणाऱ्या जहाजांसाठी एक ब्लॉकेड तयार करतील अशी धकमी दिली आहे. त्यांनी ही धमकी अमेरिका - इराण यांच्यातील पाकिस्तानमधील चर्चा कोणत्याही निर्णयाविना संपल्यानंतर दिली आहे. युएस सेंट्रल कमांडने इराणच्या सर्व बंदरांवर सोमवारपासून ब्लॉकेड निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

CENTCOM ने सांगितलं की, हे ब्लॉकेड कोणताही भेदभाव न करता इराणच्या पोर्ट किंवा किनार्यावरील भागातून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर समान लागू असेल. याचबरोबर हे ब्लोकेड अरेबियन गल्फ, गल्फ ऑफ ओमानमधील सर्व इराणच्या बंदरांसाठी लागू असणार आहे.' CENTCOM ने स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून इराणच्या बंदरावरून न येणाऱ्या जहाजांना ये जा करण्याची परवानगी असेल असे सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT