प्रातिनिधिक छायाचित्र.  File photo.
आंतरराष्ट्रीय

Iran US ceasefire | युद्धविरामानंतरही इराणमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला

Iran US ceasefire | इराणनेही कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीवर हल्ला करत दिले प्रत्‍युत्तर

पुढारी वृत्तसेवा

Iran US ceasefire

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात आज (दि.८) जाहीर झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम लागू झाल्यानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील एका तेल शुद्धीकरण प्रकल्पावर बुधवारी 'शत्रूराष्ट्राकडून' हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाचे मुखपत्र असलेल्या 'शाना' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल इराणीयन ऑईल रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने सुरक्षा आणि अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले होते.

युद्धविरामाचा करार वादाच्‍या भोवर्‍यात

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या 'पूर्णतः नष्ट' करण्याच्या धमकीनंतर, ऐनवेळी युद्ध टाळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये हा तहाचा करार झाला होता. ट्रम्प यांनी 'इराणी संस्कृती' नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर, ती रोखण्यासाठी अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली होती. मात्र, बुधवारी केवळ इराणमध्येच नव्हे, तर आखाती देशांमध्येही हल्ले सुरूच राहिल्याने हा करार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

"आमचा पूर्ण विजय" : डोनाल्‍ड ट्रम्प यांचा दावा

एएफपी (AFP) शी बोलताना अध्यक्ष ट्रम्प यांनी हा करार अमेरिकेचा "पूर्ण विजय" असल्याचे म्हटले आहे. या करारानुसार, अमेरिका दोन आठवडे इराणवरील हल्ले स्थगित ठेवणार असून, त्या बदल्यात तेहरानने जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'हॉर्मूझची सामुद्रधुनी' तात्पुरती खुली करण्यास संमती दिली होती; परंतु, ताज्या हल्‍ल्‍यामुळे या क्षेत्रातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT