Iran US Conflict pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US Conflict: इराणने US Army सोबतच केला मोठा कांड? ट्रम्प यांचे चौकशीचे आदेश, धक्कादायक माहिती समोर

Anirudha Sankpal

Iran Hack US marines Personal Data: इराणचा पाठिंबा असलेल्या एका हॅकर ग्रुपने हजारो युएस मरीन्सचा पर्सोनल डेटा लीक केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत युएसचा युद्ध विभाग याची चौकशी करत आहे. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की जो डेटा लीक झाला आहे तो ऑथेंटिक आहे. याबाबतचे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये जवळपास २००० पेक्षा जास्त युएस मरीन कमांडोंची वैयक्तिक माहिती लीक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी हे वृत्त स्थानिक अरब न्यूज वेबसाईट Shafaq.com ने याबाबतची अचूक आकडेवारी दिली असून त्यांनी हा डेटा लीक करणाऱ्या हॅकर ग्रुपचे नाव हांदाला (हांझला) असल्याचं सांगितलं. अरब पोर्टलनुसार पूर्व आशियात तैनात असलेल्या २,३७९ युएस मरीन कमांडोंचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे. या ग्रुपने या भागात कार्यरत असलेल्या युएस सर्व्हिस मेंबर्सना देखील धमकी दिली आहे.

याबाबतची माहिती टेलीग्राम ग्रुप्सवर पब्लिश करण्यात आली आहे. या हॅकर ग्रुपने पूर्व आशियात तैनात असलेल्या युएस मरीनची नावे आणि पर्सनल माहिती टेलिग्रामच्या चॅनलवर टाकली आहे. Shafaq.com रिपोर्टनुसार याद्वारे इराणच्या सर्व्हेलन्स क्षमता किती मजबूत आहे हे दिसून येते.

इराणच्या आसपासच्या भागात तैनात असलेल्या जवानांना इशारा देणारे व्हॉट्स अॅप मेसेज पाठवण्यात आले आहेत. या मेसेजमध्ये ते अंडर सर्व्हेलन्स आहेत. त्यांना लक्ष्य केलं जाईल.

या ग्रुपने युएस पर्सोनलची अजून माहिती असल्याचा दावा देखील केला आहे. यात त्यांच्या कुटुंबीयांची माहिती, घर, घराचा पत्ता, त्यांची दैनंदिन रूटीन आणि दैनिक हालचाल याची देखील माहिती त्यांच्याकडे असल्याचा दावा या ग्रुपने केला आहे. त्यांनी याबाबतची अजून माहिती उघड करण्यात येईल अशी धमकी देखील दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT