Iran US Conflict pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran US Conflict: चर्चा फिसकटल्यानंतर इराणचे शिष्टमंडळ जीव मुठीत घेऊन पोहचलं तेहरानमध्ये; इस्लामाबादमध्ये नेमकं काय घडलं?

Anirudha Sankpal

Iran US Conflict Negotiation: पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये झालेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटी कोणत्याही निष्कर्षाविना संपुष्टात आल्या. त्यानंतर इरणच्या शिष्टमंडळाला त्वरित सुरक्षेचा धोका असलल्याचे इनपुट मिळाले. त्यानंतर त्यांनी तेहरानला परत जाण्याच्या आपल्या मार्गात मोठे बदल केले. इराणचे राजकीय विश्लेषक मोहम्मद मारांदी यांनी लेबनॉनच्या एका चॅनलला सांगितलं की त्यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची आणि संसदीय स्पीकर मोहम्मद घलीबफ यांनी अर्ध्या रस्त्यात आपली फ्लाईट स्वीच केली. त्यांनी दुसऱ्या मार्गाचा वापर करत तेहरान गाठलं. त्यासाठी त्यांनी बस आणि ट्रेनचा देखील वापर केला.

तुमच्या विमानावर हल्ला होऊ शकतो...

मरांदी हे तेहरान विद्यापीठात प्रोफेसर आहेत. ते इराणच्या शिष्टमंडळासोबत इस्लामाबादमध्ये होते. त्यांनी लेबनिज न्यूज चॅनलला सांगितलं की इराणच्या शिष्टमंडळाला पाकिस्तानमधून परतीचा प्रवास करताना अत्यंत असुरक्षित वाटत होतं.

ते म्हणाले की, 'आम्हाला इस्लामाबादमधून परतत असताना तुमच्या विमानावर हल्ला होऊ शकतो असा थेट धोक्याचा इशारा मिळाला होता. त्यामुळं तेहरानला परत येत असताना आमच्या शिष्टमंडळाने गुप्तपणे विमान बदलले.'

अमेरिका प्रामाणिक नाहीये...

इराणच्या शिष्टमंडळाचे विमान हे अचानकपणे वळवण्यात आलं अन् त्याचे इराणच्या मशहाद शहरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर तेथून शिष्टमंडळाच्या सदस्यांनी तेहरानपर्यंतचा प्रवास हा रल्वे, गाडी आणि बसमधून केला.

मोहम्मद मरांदी म्हणाले की, 'आम्हाला अमेरिकेवर विश्वास नव्हता. तसेच आम्ही युद्धाच्या पुढच्या फेरीसाठी तयारी करण्यात अत्यंत व्यस्त होतो. आम्हाला पहिल्यापासूनच माहिती होतं की अमेरिका प्रमाणिक नाहीये. आम्ही जरी चर्चेच्या टेबलवर असलो तरी आमचे सरकार लष्कराचे सशक्तीकरण करत होतं.

अमेरिका इराण पुन्हा चर्चा होणार सुरू?

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी करणाऱ्या दोन्ही देशांची शिष्टमंडळे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. ते या आठवड्यात वाटाघाटीच्या टेबलवर येतील अन् मध्य पूर्व आशियातील युद्ध संपुष्टात आणण्याच्या दृष्टीकोणातून पुढे वाटचाल करतील अशी माहिती रॉयटर्सने पाकिस्तानी आणि इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे.

दरम्यान, याबाबत अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून त्वरित कोणताही होकार कळवण्यात आलेला नाही. मात्र जे चर्चेत सहभागी होते त्या सूत्रांकडून असं कळतंय की दोन्ही देशांचे शिष्टमंडळांनी इस्लामाबादमध्ये चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी यावे याबाबतचा प्रस्ताव वॉशिंग्टन आणि तेहरानला पाठवण्यात आला आहे. याबाबत अजून तारीख निश्चित झालेली नाही मात्र दोन्ही देश लवकरच युद्ध संपवण्यासाठी या आठवड्यात चर्चेच्या टेबलवर पुन्हा येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT