Iran Uranium Heist pudhari
आंतरराष्ट्रीय

Iran Uranium Heist: पायलट रेस्क्यू मिशन हा तर बनाव, त्याच्या आडून अमेरिकेने आखला होता मोठा डाव... इराणचा धक्कादायक दावा

Anirudha Sankpal

Iran Uranium Heist Mission: अमेरिकेने ५ एप्रिल रोजी आपल्या आका मिसिंग पायलटला इराणमध्ये ३०० किलोमीटर आत घुसून रेस्क्यू केलं होतं. लष्करी ऑपरेशनमधील हे एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक मिशन म्हणून गणलं जात आहे. अमेरिकेच्या लष्कराचे यासाठी तोंडभरून कौतुक होत आहे.

इराणने अमेरिकेचे एफ १५ स्ट्राईक ईगल हे ट्विन इंजिन, टू सीटर फायटर जेट पाडले होते. त्यावेळी दोन्ही विमानातील दोन्ही पायलट्सनी इजेक्ट केलं होतं. एकाला रेस्क्यू करण्यात अमेरिकेला यश आलं होतं मात्र एक एअरमन मिसिंग होता. त्याच्या शोधात इराणचे लष्कर आणि अमेरिकेचे स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे जवान देखील होते.

इराणचा मोठा दावा

मात्र आता या रेस्क्यू मिशनबाबत इराणने मोठा दावा केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाक्वेई यांनी हे ऑपरेशन एअरमनला रेस्क्यू करण्यासाठी नव्हतेच असा दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की, 'हे ऑपरेशन इराणचे समृद्ध युरेनियम चोरण्यासाठी करण्यात आलेला बनाव होता याची शक्यता अजिबात नाकारता येणार नाही. या मोहिमेबाबत अनेक प्रश्न आणि अनेक अनिश्चितता तयार झाल्या आहेत.

इस्माईल पुढे म्हणाले की, 'कोहगिलुयेह आणि बॉयर अहमद भागात ज्या भागात अमेरिकेचा पायलट होता असा दावा केला जात आहे. तो भाग अमेरिकेचे स्पेशल ग्रुपचे जवान रेस्क्यू मिशनसाठी उतरण्याचा प्रयत्न करत असलेल्या भागापासून खूप लांब होता.' इस्माईल यांनी अमेरिकेचे हे ऑपरेशन डिझास्टर म्हणून संबोधलं आहे.

इराणचं युरोनियम का आहे महत्वाचं?

इराणकडे जवळपास ४०० ते ४५० किलोग्राम समृद्ध युरेनियम असल्याचा दावा केला जात आहे. एवढे समृद्ध युरेनियम हे अणुबॉम्ब तयार करण्यासाठी पुरेसं आहे. गेल्या आठवड्यात द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणमध्ये ग्राऊंड ऑपरेशन करण्याच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत अदा दावा करण्यात आला होता. हे ऑपरेशन इराणचे समृद्ध युरेनियम ताब्यात घेण्यासाठी करण्यात येईल असा देखील दावा करण्यात आला होता.

डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील युद्ध थांबवण्यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्यात इराणने युरेनियम आमच्याकडे सोपवावं याचा समावेश होता असा देखील दावा केला जातोय.

युरेनियम हस्तांतरित करण्यास इराणचा नकार

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना सांगितलं होतं की इराण अणुबॉम्ब तयार करण्याचे मटेरियल आपल्याजवळ ठेवू शकत नाही. आम्ही हे बळजबरीने त्यांच्याकडून जप्त करू असा देखील इशारा त्यांनी दिला होता. वाटाघाटीवेळी इराणने आपले समृद्ध युरेनियम हस्तांतरित करण्यास नकार दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT