India Nuclear Weapons 
आंतरराष्ट्रीय

India UN Nuclear Weapons | अणवस्त्रांच्या वापरावर मानवाचेच नियंत्रण हवे; संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने स्पष्ट केली भूमिका

India UN Nuclear Weapons | भारताने संयुक्त राष्ट्रे भूमिका स्पष्ट; अण्वस्त्र कमांड यंत्रणेतील एआय वापरावर चिंता

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
अणवस्त्रांचा वापर करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा केवळ मानवाकडूनच घेतला गेला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये केले आहे. अण्वस्त्र कमांड आणि नियंत्रण यंत्रणेत कृत्रिम बुद्धिम तंत्रज्ञानाचा वाढता वापर गंभीर प्रश्न निर्माण करत असल्याचा इशारा भारताने संयुक्त राष्ट्र महासभांच्या पहिल्या समितीत बोलताना दिला. यासोबतच भारताने आपल्या 'नो फर्स्ट यूज' (प्रथम वापर नाही) या पारंपरिक अण्वस्त्र धोरणाचा पुनरुच्चार केला.

संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या समितीत भारताचे अधिकृत निवेदन सादर करताना काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी देशाची भूमिका मांडली. अण्वस्त्र नियंत्रण यंत्रणेतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाल्यावर भाष्य करताना मनीष तिवारी म्हणाले, अण्वस्त्र कमांड आणि कंट्रोल प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अनेक गंभीर व वास्तविक प्रश्न निर्माण करतो, ही बाब भारत मान्य करतो. अण्वस्त्रांचा वापर करण्याचा अंतिम निर्णय हा नेहमी मानवाच्या हातात असला पाहिजे, या मूलभूत तत्त्वाचे भारत ठामपणे समर्थन करतो.

आतंकवादाविरुद्ध जागतिक प्रयत्नांना पाठिंबा

'ट्रीटी ऑन द प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स' भारतावर कोणतीही कायदेशीर बंधने लादत नसली, तरी जागतिक शांतता आणि अप्रसार मजबूत करण्याबाबत भारताची बांधिलकी कायम आहे. दहशतवादी किंवा अराजक घटकांच्या हाती अण्वस्त्रे व आण्विक तंत्रज्ञान पडू नये यासाठीच्या सर्व आंतरराष्ट्रीय उपायांना भारत सातत्याने पूर्ण पाठिंबा देत राहील, असे भारताने शेवटी स्पष्ट केले.

'नो फर्स्ट यूज' आणि विश्वासार्ह प्रतिबंधत्मक क्षमता

भारताच्या अण्वस्त्र नीतीचा स्पष्ट उल्लेख करत तिवारी यांनी सांगितले की, भारत 'क्रेडिबल मिनिमम डिटेरन्स' (विश्वासार्ह किमान प्रतिबंधक क्षमता), 'नो फर्स्ट यूज' (प्रथम वापर न करणे) आणि अण्वस्त्र नसलेल्या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर न करणे या धोरणांवर कायम आहे. या वचनबद्धतेला बहुपक्षीय कायदेशीर चौकटीत रूपांतरित करण्याची भारताची तयारी आहे. भारताची अण्वस्त्र क्षमता देशाच्या विशिष्ट सुरक्षा गरजांवर आधारित असून ती कोणत्याही एकध्या देशाला लक्ष्य करून विकसित केलेली नाही. तसेच अणुचाचणीवरील स्वयंपोषित बंदीचे पालन करण्यास भारत कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले.

भेदभावविरहित अण्वस्त्रमुक्तीची मागणी

अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणावरील भारताची पारंपरिक भूमिका मांडताना तिवारी म्हणाले, नि:शस्त्रीकरण प्रक्रिया सार्वत्रिक, भेदभावविरहित आणि पडताळणीयोग्य असली पाहिजे. भारताने २००६ आणि २००७ मध्ये मांडलेली चरणबद्ध नि:शस्त्रीकरणाची भूमिका आजही तितकीच सुसंगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT