US Iran Israel War pudhari
आंतरराष्ट्रीय

US Iran Israel War: भारत इराणच्या मदतीला आला धावून... नौदलाच्या १८३ सैनिकांना दिला आसरा

Anirudha Sankpal

US Iran Israel War: अमेरिकेच्या पाणबुडीने दोन दिवसांपूर्वीच भारतीय समुद्र हद्दीच्या जवळ इराणची एक युद्धनौदा बुडवली होती. यानंतर भारतानं इराणच्या एका युद्धनौकेला भारतातील कोची बंदरात त्यांची युद्धनौका डॉक करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर या युद्धनौकेवरील १८३ सदस्यांना देखील नौदलाच्या एका फॅसिलिटीमध्ये आसरा दिला आहे. याबाबतची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

इराणची युद्धनौका कोचीमध्ये डॉक

भारताने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू अर्थात युद्धाभ्यास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात इराणची IRIS लावन ही युद्धनौका देखील सहभागी झाली होती. ही युद्धनौका बुधवारी कोची इथं डॉक करण्यात आली होती. त्याच दिवशी इराणची दुसरी युद्धनौका IRIS Dena ही श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून १८ नॉटिकल माईल्सवर अमेरिकेच्या पाणबुडीने बुडवली होती.

गुरूवारी श्रीलंकेच्या अजून एका इराणच्या युद्धनौका IRIS बूशेहरला त्यांच्या देशात आसरा घेण्याची परवानगी दिली होती. या युद्धनौकेवरील २०८ क्रू मेंबर्सना देखील नौदलाच्या कॅम्पमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आली होती. IRIS बूशेहर ही देखील भारताने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासात सामील झाली होती.

क्रू मेंबर्स देखील भारतात

दरम्यान ओळख न सांगण्याच्या अटीवर भारताच्या अधिकाऱ्याने सांगितलं की भारताने IRIS Lavan शी संपर्क केला होता. ही युद्धनौका २८ फेब्रवारी रोजी भारतात झालेल्या युद्धाभ्यासात सामील झाली होती. या युद्धनौकेने १ मार्च रोजी डॉक करण्याची परवानगी मागितली होती. त्यांना ४ मार्च रोजी कोचीमध्ये त्यांची युद्धनौका डॉक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ही परवानगी इराणकडून मागण्यात आली होती. त्यांनी IRIS Lavan मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यानं अर्जंट बेसिसवर कोचीमध्ये डॉक करण्याची परवानगी मागितली होती. या वॉरशिपवरील १८३ क्रू मेंबर्सना कोचीमधील नौदलाच्या तळावर राहण्याची सोय करण्यात आली आहे.

भारतानं घेतली मोठी रिस्क?

दरम्यान, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी गुरूवारी एख वक्तव्य प्रसिद्ध केलं होतं. त्यात मानवतेच्या दृष्टीकोणातून IRIS Booshehr च्या क्रू मेंबर्सना त्रिनकोमाली बंदरावर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की ही सामान्य परिस्थिती नाहीये. मात्र आम्हाला आंतरराष्ट्रीय करार आणि कनव्हेंशनचा देखील विचार करणे गरजेचे आहे.'

अमेरिकेने IRIS Dena बुडवल्यानंतर भारत आणि श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली होती. भारत आणि श्रीलंकेच्या समुद्र हद्दीच्या अगदी जवळ ही घटना घडल्यानं या भागातील समुद्री व्यापारावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताचे आणि इराणचे फार पूर्वीपासून संबंध आहेत. तर युएस हा भारताचा एक महत्वाचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. त्यामुळं भारत द्विधा मनःस्थितीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT