IMF on Pakistan:
इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानच्या आर्थिक मदत योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 11 नवीन अटी लावल्या असून भारताशी वाढलेल्या तणावामुळे या कार्यक्रमाच्या आर्थिक, बाह्य व सुधारणा उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. Express Tribune या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
IMF च्या स्टाफ लेव्हल रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेला तणाव जर कायम राहिला किंवा अधिक वाढला, तर पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Rs 17.6 ट्रिलियनचा नवीन बजेट संसदेमधून मंजूर करणे.
वीज बिलांवरील कर्जफेड अधिभार (debt servicing surcharge) वाढवणे.
3 वर्षांहून जुनी वापरलेली गाड्या आयात करण्यावरची बंदी हटवणे.
राज्यांकडून (प्रांतिक सरकार) कृषी उत्पन्न कराची अंमलबजावणी – करदात्यांची नोंदणी, रिटर्न प्रक्रिया, जनजागृती मोहीम, अनुपालन सुधार योजना तयार करणे. मुदत – जून 2025.
"Governance Diagnostic Assessment" वर आधारित एक कारवाई योजना जाहीर करणे.
2027 नंतरच्या कालावधीसाठी आर्थिक धोरणांची रूपरेषा तयार करणे व प्रकाशित करणे.
वार्षिक वीज दर पुनर्निधारण (tariff rebasing) जाहीर करणे – मुदत 1 जुलै 2025.
गॅस दरातील अर्धवार्षिक समायोजन जाहीर करणे – मुदत 15 फेब्रुवारी 2026.
Captive Power Levy Ordinance कायदा कायमस्वरूपी बनवणारा कायदा संसदेमधून मंजूर करणे – मुदत मे 2025 अखेर.
Rs 3.21 प्रति युनिटची वीज अधिभार मर्यादा (cap) काढून टाकणारा कायदा संसदेमधून मंजूर करणे – मुदत जून 2025.
Special Technology Zones व औद्योगिक पार्कसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रोत्साहन योजना 2035 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद करण्याची योजना तयार करणे – मुदत डिसेंबर 2025.
याशिवाय, ग्राहकांसाठी अनुकूल असलेल्या एका अटीत IMF ने सांगितले आहे की, पाच वर्षांखालील वापरलेल्या गाड्यांच्या व्यावसायिक आयातीवरील सर्व प्रमाणात्मक निर्बंध हटवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रस्तावना जुलैअखेर संसदेत मांडावी. सध्या फक्त तीन वर्षांपर्यंतच्या वापरलेल्या कारच आयात करता येतात.
भारताने 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने 8, 9 आणि 10 मे रोजी भारतीय लष्करी तळांवर प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला.
10 मे रोजी ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान संघर्ष थांबवण्याची तडजोड झाली.