Himanshi Khurana Murder Case: कॅनडाच्या पोलिसांनी ३२ वर्षाच्या युवकाला टोरोंटो येथून अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय वंशाची तिची लिव्ह इन पार्टनर हिमांशी खुराणाचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये खून केल्याचा आरोप आहे. टोरोंटो पोलिसांनी सांगितलं की, भाररी पथक आणि हमिसाईड युनिटने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेची मदत घेत अब्दुल गफूरीला पुन्हा कॅनडात आणण्यात यश मिळवलं आहे. पोलिसांनी या गफूरला कोणत्या देशातून उचलण्यात आलं याबाबतची माहिती मात्र दिली नाही.
खुराणा ही २०२५ मधील टोरोंटो येथील ४० वी होमिसाईड व्हिक्टिम होती. तपास यंत्रणांच्या हिमांशीचा खून झाल्याचा निष्कर्ष काढला होता. ती गफूरीसोबत एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. गफूरला टोरोंटो पोलिसांनी शुक्रवारी एअरपोर्टवर अटक केली.
पोलिसांनी सांगितलं की गफूरीला शनिवारी सकाळीच कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यावर फर्स्ट डिग्री खूनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, डिसेंबरमध्ये हिमांशी खुराणाचा मृतदेह तिच्या स्ट्रेचन एव्हेन्यूजवळील विलिंग्टन स्ट्रीटवरील घरी आढळून आला होता. पोलिसांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी एका मिसिंग कंप्लेंटनंतर तापस सुरू केला होता. त्यावेळी हिमाशी ही तिच्या घरी मृत आढळून आली होती.
भारतीय दूतावासाने खुराणाच्या मृत्यूनंतर तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी दूतावासाने आम्ही हिमांशी खुराणाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत असं सांगितलं होतं. त्यांना योग्य ती सर्व मदत करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं होतं.