पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनाचा म्‍होरक्‍या आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्‍ल्‍याचा सूत्रधार हाफिज सईद. File Photo
आंतरराष्ट्रीय

Hafiz Saeed Terror plot : 'मोस्ट वाँटेड' हाफिज सईदचा कुटील डाव! बांगलादेशचा वापर करत रचला भारतावर हल्ल्याचा कट

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह सैफच्‍या व्‍हायरल व्‍हिडिओमधून धक्‍कादायक माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

Hafiz Saeed Terror plot

नवी दिल्ली: पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) आणि जमात-उद-दावा (Jamaat-ud-Dawa) या दहशतवादी संघटनाचा म्‍होरक्‍या आणि मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्‍ल्‍याचा सूत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed) याने भारतावर हल्ला करण्याचा कट रचत आहे. भारतावर हल्‍ल्‍यासाठी आता तो बांगलादेशमध्‍ये नवीन दहशतवादी तळच उभारले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे झालेल्या एका सभेतील व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून हा खुलासा झाला आहे.

बांगालादेशमध्‍ये उभारले दहशतवादी तळ

खैरपूर तामेवाली येथे झालेल्या सभेत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह सैफने म्‍हटलं की, “हाफिज सईद निष्क्रिय बसलेला नाही; तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी बांगलादेशमध्ये सक्रिय होते. पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यावेळी हा दहशतवादी तळ भारतावर हल्‍ला करणार होता, असेही त्‍याने म्‍हटलं आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून सईद बांगलादेशमधील तरुणांना ‘जिहाद’च्या नावाखाली भारताविरोधात वापर करत असल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले आहे.

अमेरिका आमच्यासोबत आहे

सैफुल्लाह सैफ हा उघडपणे भारताविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी चिथावणी देत ​​असल्याचेही व्‍हिडिओमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये बदल झाल्याचा दावा करत म्हटले, "आता, अमेरिका आमच्यासोबत आहे. बांगलादेश आणि पाकिस्‍तानमधील मैत्री पुन्‍हा एकदा वाढली आहे, असा दावाही त्‍याने केला आहे. विशेष म्‍हणजे या सभेतला लहान मुलेही उपस्थित होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा भारताविरुद्ध 'जिहाद' करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांचे शोषण सुरु असल्‍याचेही स्‍पष्‍ट होत आहे.

सुरक्षा दल सतर्क

दरम्‍यान, बांगलादेश-पाकिस्तान संबंधातून निर्माण होणाऱ्या या नवीन, गुंतागुंतीच्या धोक्याबाबत सुरक्षा एजन्सी आता सतर्क आहेत, असे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे. बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT