H-1B Visa Raw :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B Visa वर येणाऱ्या परदेशी कुशल मनुष्यबळाबाबत मोठा निर्णय घेतला. त्यांनी H-1B Visa वार्षिक फी काही हजार डॉलवरून वाढवून १ लाख डॉलर इतकी केली आहे. याचा सर्वाधिक फटका हा भारतातील इंजिनिअर्स जे अमेरिकेत जाऊन जॉब करण्याची स्वप्न पाहत होती त्यांना होणार आहे. याचबरोबर अमेरिकेत भारतीय वंशाचे डॉक्टर्स देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. या निर्णयानंतर त्यांचे देखील भविष्य अधांतरी झालं होतं.
मात्र आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं डॉक्टर आणि मेडिकल रेसिडन्ट यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी ब्लूमबर्ग न्यूजला एक वक्तव्य दिलं. ते म्हणाले, 'डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात काहींना वगळ्याची मुभा आहे. त्याप्रमाणं आम्ही फिजिशियन आणि मेडिकल रेसिडंट यांना समाविष्ट करण्यात येऊ शकत.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात H-1B Visa ची वार्षिक फी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यात जर युएस होमलँड सेक्रेटरी यांना H-1B Visa वर आलेल्या काही विशिष्ठ कर्मचाऱ्यांची किंवा ते काम करत असलेली कंपनी किंवा इडस्ट्री देशाच्या हिताशी संबंधित असेल तर त्यांना ही वार्षिक फी माफ करता येऊ शकते.
दरम्यान, ज्यावेळी अमेरिकेतील मोठ्या वैद्यकीय संस्थांनी ट्रम्प यांच्या या निर्णयामुलं अमेरिकेच्या ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरचा भासू शकते असा इशारा दिला. त्यावेळी ट्रम्प प्रशासनाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
यापूर्वी H-1B Visa ची वार्षिक फी ही २१५ डॉलर्स इतकी होती. त्याच्या जोडीला काही डॉलर्स प्रोसेसिंग चार्जेस लागत होते. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं H-1B Visa ची फी २१५ डॉलर वरून थेट १ लाख डॉलर एवढी वाढवली आहे. मात्र यानंतर ट्रम्प प्रशासनानं अनेक बाबतीत माघार घेतली आहे. जे सध्या H-1B Visa वर काम करत आहेत. त्यांना ही फी लागू होणार नाही असा खुलासा केला आहे.