आंतरराष्ट्रीय

Nigeria Attack : नायजेरियात मोठा हल्ला; बेछूट गोळीबारात ४० लोक ठार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आफ्रिकन देश नायजेरियातील एका गावात हत्यारबंद हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी अनेक घरांना आग लावली, त्यानंतर गोळीबार केला. नायजेरियाच्या उत्तर-मध्य भागात असलेल्या पठार राज्यात ही घटना घडली आहे.

पठार पोलिसांचे प्रवक्ते आल्फ्रेड अलाबो यांनी सांगितले की, पठार बांगलाच्या जंगलात सुरक्षा दलाच्या हल्ल्यातून पळून गेलेल्या हल्लेखोरांनी सोमवारी रात्री उशिरा जुराक आणि डकई गावांवर हल्ला केला. घरे जाळल्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यात ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान सुरक्षा दलाने सात हल्लेखोरांना ठार केले. मृतांची संख्या वाढू शकते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT