GTA 6 Game Launching pudhari
आंतरराष्ट्रीय

GTA 6 Game Launching: GTA 6 लाँच झाला अन् लष्करातील तब्बल ४३ जवानांनी सेवा वाढवण्याचा निर्णय का घेतला?

जगभरात चर्चा असलेला ग्रँड थेफ्ट ऑटो ६ हा गेम खेळण्यासाठी अमेरिकेच्या लष्करातील जवानांनी आपला कार्यकाळ वाढवला आहे.

Anirudha Sankpal

GTA 6 Game Launching: : नुकतेच प्रसिद्ध व्हिडिओ गेम GTA 6 लाँच झाला आहे. त्याची चर्चा जगभर असून तुफान प्री बुकिंगमुळे याची क्रेझ किती आहे याचा अंदाज येतो. व्हिडिओ गेम खेळण्याचा शौक हा फक्त किशोरवयीन मुलांमध्येच नाही तर अमेरिकेच्या लष्करामध्ये देखील पहायला मिळत आहे. अमेरिकेच्या लष्करातील ४३ जवानांनी या जीटीए ६ च्या प्रेमापोटी असा निर्णय घेतला की सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. या ४३ जवानांनी आपली सेवा संपुष्टात आणण्याऐवजी त्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेच्या लष्करात काही वर्षे काम केल्याच्या मोबदल्यात जवानांना गेम खेळण्यासाठी चार दिवसांची सुट्टी मिळते. ही अनोखी ऑफर समोर आल्यानंतर सर्वत्र याची चर्चा होत आहे.

जगभरात चर्चा असलेला ग्रँड थेफ्ट ऑटो ६ हा गेम खेळण्यासाठी अमेरिकेच्या लष्करातील जवानांनी आपला कार्यकाळ वाढवला आहे. विशेष म्हणजे या जवानांना गेम खेळण्यासाठी जी सुट्टी देण्यात येणार आहे ती या गेमच्या रिलीजच्या आसपास मिळणार आहे. त्यामुळे आता हे जवान कोणतेही टेन्शन न घेता गेम खेळू शकतील. ही ऑफर अमेरिकेच्या जॉर्जियामधील फोर्ट स्टीवर्टमध्ये तैनात असलेल्या एका लष्करी युनिटला देण्यात आली आहे.

कोणी दिली ऑफर?

ही ऑफर अमेरिकेच्या ९ व्या ब्रिगेड इंजीनियर बटालियनकडून देण्यात आली आहे. या युनिटमध्ये सामील जवानांना सांगण्यात आलं आहे की जर ते आपली लष्करातील सेवा वाढवण्याचा निर्णय घेतात आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्ट साईन करतात तर त्यांना GTA 6 खेळण्यासाठी चार दिवसांची सुट्टी देण्यात येईल. यासाठी जवानांना किमान २ वर्षे आणि जास्तीजास्त ६ वर्षे लष्करात सेवा देण्यासाठी सहमती द्यावी लागेल. ही ऑफर १ ऑगस्ट पासून १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पुन्हा सेवा कॉन्ट्रॅक्ट साईन करणाऱ्या जवानांना मिळणार आहे.

या युनिटमध्ये एकूण १३० जवान या ऑफरसाठी पात्र ठरले होते. त्यातील ४३ जवानांनी या ऑफरचा फायदा उचलला आणि आपले लष्करी सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जवळपास ३ पैकी १ जवानाने या ऑफरचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे.

१९ ते २२ नोव्हेंबरपर्यंत मिळणार सुट्टी

GTA 6 हा १९ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. जगभरात हा गेम खेळणाऱ्यांमध्ये याची खूप चर्चा आहे. हे पाहूनच लष्कराकडून ४ दिवसाच्या सुट्टीचे आयोजन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही ऑफर घेणाऱ्या जवानांना १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर रजा मिळणार आहे. गुरूवारपासून रविवारपर्यंत जवान आपल्या ड्युटीपासून दूर होऊन गेम खेळू शकतात. ही सुट्टी फक्त गेम खेळण्यासाठी नाही तर जवानांना लष्करी सेवेत ठेवण्याच्या योजनेचा एक भाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT