fire accident in Kuwait
कुवैतमध्ये घराला लागलेली भीषण आग  Deccon Herald
आंतरराष्ट्रीय

Kuwait Fire Accident : केरळमधील एकाच कुटुंबातील चौघांचा भीषण आगीत होरपळून मृत्यू

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुवेतमधील अब्बासिया (Kuwait Fire Accident) येथे शुक्रवारी (दि.19) घराला लागलेल्या आगीमध्ये होरपळून भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तिरुवल्ला नीरेत्तुपुरमचे रहिवासी मॅथ्यू मुझाकल, त्यांची पत्नी लिन अब्राहम आणि त्यांची मुले आयझॅक आणि आयरीन अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब केरळ येथील रहिवाशी होते.

शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे अब्बासिया येथील अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आग लागली. कुवेतच्या अब्बासिया या भागात बहुतेक मल्याळी लोक राहतात. मुझाकल कुटुंब दोन दिवसांपूर्वी केरळला सुट्टीसाठी आले होते. शुक्रवारी (दि.19) ते कुवेतला परतले. शुक्रवारी रात्री नऊनंतर ही आग लागल्याने त्यांच्या या आगीच्या धुरामध्ये घुसमटून आणि होरपळून झाल्याची माहिता डेक्कन हेराल्ड वृत्तसंस्थेने दिली आहे. ते भारतातून कुवैतमध्ये पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही दुःखद घटना घडली. एसीमधून आग आणि धूर निघताना त्याच्या शेजाऱ्यांना दिसला होता. आगीतून निघणाऱ्या धुरामुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली, मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.

माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले, त्यामुळे आग आजूबाजूच्या भागात पसरली नाही. सध्या अपघाताबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मृत मॅथ्यू हे बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्याची पत्नी लीन एक नर्स होती. अब्बासिया युनायटेड इंडियन स्कूलजवळील एका इमारतीत हे कुटुंब राहत होते. (Kuwait Fire Accident)

गुरुवारी सुट्टी संपवून कुवेतला रवाना

मॅथ्यू गेल्या 15 वर्षांपासून कुवैतमध्ये काम करत आहे. त्याची पत्नीसुद्धा तेथे परिचारिका आहे. त्यांची मुले तेथे शिकत आहेत. ते गुरुवारी रात्री नेदुम्बसेरी येथून सुट्टी संपवून निघाले, असे एका नातेवाईकाने शनिवारी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यांच्या मूळगावी त्यांचा मृतदेह आल्याची कोणतीही अधिकृत पुष्टी पीडित कुटुंबाने केलेली नाही. मॅथ्यू यांच्या पश्चात आई आणि तीन भावंडे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खोलीतील एसीमध्ये शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली आहे.

SCROLL FOR NEXT