बालिकाश्रम रस्त्यावर दोन दुकाने आगीत खाक

माहिती मिळताच अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले
Fire broke out at shops in Sudke Mala area on Balikashram road on Monday evening
बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा परिसरात सोमवारी सायंकाळी दुकानांना लागलेली आगसमीर मन्यार
Published on
Updated on

नगर : शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा परिसरात सोमवारी सायंकाळी पत्र्याच्या शेडमध्ये असणार्‍या दोन दुकानांना आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात दोन्ही दुकाने जळून खाक झाली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.

दुकान व इलेक्ट्रिक दुचाकी खाक

बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा परिसरात सोमवारी सायंकाळी पत्र्याच्या शेडमधील दुकानांना आग लागली. त्यात चप्पल दुकान व इलेक्ट्रिक दुचाकी जळाली. शेजारी असणार्‍या फॅब्रिकेशनच्या दुकानाला आग लागून दुकानातील सर्व मशिनरी खाक झाल्या.

Fire broke out at shops in Sudke Mala area on Balikashram road on Monday evening
Ahmednagar Accident : मोठा अनर्थ टळला! खचाखच भरलेली एसटी बस चारीत कोसळली; महिलांसह अनेक शालेय विद्यार्थी जखमी

काही मिनिटांत आग आटोक्यात

आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. पण, बघ्यांची गर्दी व वाहतूक कोंडीमुळे आग विझविण्याला अडथळा निर्माण झाला. दरम्यान, घटनास्थळी माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांनाही धाव घेत वाहतूक पांगविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news