FBI Director Kash Pate Pudhari
आंतरराष्ट्रीय

FBI Director Kash Patel | एफबीआयमध्ये वाद शिगेला! काश पटेल यांचे नाईटक्लब प्रकरण चर्चेत; 13 तास काम, पत्नीशी नातं तुटलं...

FBI Director Kash Patel | काश पटेल यांच्यावर जेम्स कोमी यांची जहाल टीका

Akshay Nirmale

FBI Director Kash Patel

वॉशिंग्टन, डी.सी. : अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) चे संचालक काश पटेल सध्या त्यांच्या नेतृत्वशैलीवरून चर्चेत आले आहेत. काही माजी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर एफबीआय मुख्यालयात उपस्थित नसल्याचा, तसेच कामाप्रती गाफील असल्याचा आरोप केला आहे.

मात्र एफबीआयचे डेप्युटी डायरेक्टर डॅन बोंगिनो यांनी या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले असून, पटेल हे अत्यंत मेहनती आणि समर्पित अधिकारी असल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळी 6 वाजता ऑफिस, रात्री 7 पर्यंत काम!

फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डॅन बोंगिनो म्हणाले, "काश पटेल सकाळी 6 वाजता ऑफिसमध्ये येतो आणि संध्याकाळी 7 वाजताच्या आधी क्वचितच घरी जातो. जर कोणी समजत असेल की आम्ही येथे टी आणि क्रंपेट्ससाठी (फार्स) आलो आहोत, तर ती चुकीची धारणा आहे. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडतो."

त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील त्रासदायक पैलूंनाही उजाळा दिला. "माझ्या कुटुंबावर याचा परिणाम झाला आहे. मी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये चार भिंतींमध्ये एकटाच असतो.

मी पत्नीपासून विभक्त झालो आहे (घटस्फोट नाही, पण दूर राहत आहे). पण मी काहीही तक्रार करत नाही. मी जेम्स कोमी नाही. मी हे स्वतःहून निवडले आहे, आणि मला याचा अभिमान आहे," असे ते म्हणाले.

जेम्स कोमींची टीका, काश पटेल यांचा प्रत्युत्तर

माजी एफबीआय संचालक जेम्स कोमी यांनी काश पटेल आणि डॅन बोंगिनो यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "एफबीआयमध्ये अनेक अनुभवी लोक आहेत, आणि आशा आहे की हे दोघे त्यांचं ऐकतात," असे ते CNN ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

या टीकेला उत्तर देताना काश पटेल यांनी कोमी यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी कोमी यांची एक इंस्टाग्राम पोस्ट ज्यामध्ये '86 47' ही संख्या होती. ती म्हणजे ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला असल्याचा आरोप केला.

या पोस्टमुळे एफबीआयला अनेक गंभीर प्रकरणांमधून (बाल लैंगिक शोषण, ड्रग तस्करी) तपास अधिकारी कमी करावे लागले, असा दावा पटेल यांनी केला. कोमी यांनी नंतर ही पोस्ट हटवली आणि त्याचा उद्देश हिंसक नव्हता, असे स्पष्ट केले होते.

नाईटक्लब वाद आणि गुप्तचर अहवालांवरील चर्चा

एफबीआयचे माजी कॉउंटर इंटेलिजन्स प्रमुख फ्रँक फिग्लिझी यांनी आरोप केला की, "काश पटेल अनेकदा नाईटक्लबमध्ये दिसून येतात आणि त्यांचे इंटेलिजन्स ब्रीफिंग्स फक्त आठवड्यातून दोनदा घेतले जाते."

या आरोपांनंतर बोंगिनो यांनी पुन्हा स्पष्ट केलं की, "आम्ही हे काम फक्त नावापुरतं करत नाही. आम्ही आमचं 100 टक्के योगदान देतो."

काश पटेल यांची पार्श्वभूमी

काश पटेल यांचा जन्म 1980 मध्ये न्यू यॉर्कमध्ये गुजराती कुटुंबात झाला. बालपणातील काही वर्षे त्यांनी ईस्ट आफ्रिकेत घालवली. नंतर त्यांनी लॉंग आयलंड येथील गार्डन सिटी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

त्यांनी कायद्यात पदवी घेतली असून एफबीआयमध्ये विविध पदांवर काम केलं आहे. ट्रम्प प्रशासनात त्यांनी विशेषतः रशिया-ट्रम्प संबंध प्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

काश पटेल यांच्यावर टीका होत असली तरी त्यांचे सहकारी आणि उपसंचालक त्यांच्यासाठी उभे असल्याचे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT