False Hindu God Canva Pudhari Image
आंतरराष्ट्रीय

False Hindu God : खोटे हिंदू देवता... Hanuman Statue वरून अमेरिकेत वाद; ट्रम्प यांच्या पक्षाचा नेता आता धर्मावर घसरला

टेक्सासचे रिपलब्लिक नेते अलेक्झांडर डंकन यांनी श्री हनुमान आणि हिंदू देवतांबद्दल एक आक्षेपार्ह ट्विट केलं आहे.

Anirudha Sankpal

False Hindu God False Hanuman Statue Controversy :

टेक्सासचे रिपलब्लिक नेते अलेक्झांडर डंकन यांनी श्री हनुमान आणि हिंदू देवतांबद्दल एक आक्षेपार्ह ट्विट केलं आहे. यामुळं सध्या अमेरिकेत वेगळा वाद निर्माण झाला आहे. युएस सिटीमध्ये श्री हनुमान यांचा ९० फुटी पुतळा उभारण्यात आळा आहे. त्याला स्टॅचू ऑफ युनिकॉर्न असं देखील संबोधलं जातं. यावरूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नेते डंकन यांनी वादग्रस्त ट्विट केलं. त्यानं अमेरिका हा ख्रिश्चन देश असल्याचा दावा देखील केला आहे.

डंकन यांनी ट्विट केलं की, 'टेक्सासमध्ये आपण खोट्या हिंदू देवतांचे पुतळे उभारण्याची परवानगी का देतोय? आपला देश हा ख्रिश्चन देश आहे.' या ट्विटसोबत डंकन यांनी टेक्सासमधील श्री अष्टलक्ष्मी मंदीराचा व्हिडिओ देखील जोडला आहे. इथं श्री हनुमान यांची ९० फुटी मुर्ती विराजमान आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये या रिपब्लिकन नेत्यानं बायबलमधील कोट शेअर केला. तो म्हणतो, 'तुमच्यासाठी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी देव नाही.'

दरम्यान, अलेक्झांडर डंकन यांच्या या ट्विटवर आता प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका होत आहे. हिंदू अमेरिकन फाऊंडेशननं डंकन यांना अँटी हिंदू संबोधलं आहे. याचबरोबर त्यांनी डंकन यांच्याविरूद्ध टेक्सास येथील रिपब्लिकन पक्षाकडे देखील तक्रार दाखल केली आहे.

हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने 'हॅलो टेक्सास GOP, तुम्ही तुमच्या पक्षाच्या सिनेट उमेदवाराला जरा आवर घालता का... ते तुमच्या पक्षाच्या भेदभाव विरोधी गाईडलाईनचं उल्लंघन करत आहेत. त्यांनी हिंदू विरोधी वक्तव्य केलं आहे. त्यांनी एस्टॅब्लिशमेंट क्लॉजमधील पहिल्या दुरूस्तीचा अपमान केला आहे.' असं ट्विट केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT