Ethiopia Volcano News
इथिओपियाच्या ईशान्येकडील प्रदेशात सुमारे १२,००० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे सुमारे नऊ मैलांपर्यंत (सुमारे १४.५ किलोमीटर) धुराचे दाट लोट आकाशात पसरले, अशी माहिती टूलूस ज्वालामुखी राख सल्लागार केंद्राने (VAAC) दिली आहे. दरम्यान, १००-१२० किमी/तास वेगाने वारे वाहत होते आणि राख भारतासह अनेक देशांमध्ये पसरली.
इरिट्रियन सीमेजवळ आदिस अबाबाच्या ईशान्येस सुमारे ५०० मैल अंतरावर इथिओपियाच्या अफार प्रदेशात स्थित हेली गुब्बी ज्वालामुखीचा रविवारी काही तासांपर्यंत उद्रेक झाला. सुमारे १,५०० फूट उंच असलेला हा ज्वालामुखी 'रिफ्ट व्हॅली' मध्ये आहे. हा प्रदेश दोन भूपट्टांच्या भेटीमुळे तीव्र भूगर्भीय हालचालींसाठी ओळखला जातो. येथशे दोन टेक्टोनिक प्लेट्स (भूपट्ट) एकत्र येतात.ज्वालामुखीतील राखेचे ढग येमेन, ओमान, भारत आणि उत्तर पाकिस्तानवर वाहून गेले, असे 'व्हीएएसी'ने म्हटले आहे, ज्याने राखेच्या ढगाच्या मार्गाचा नकाशा पोस्ट केला आहे.
मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे ज्वालामुखीशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक सायमन कार्न यांनी स्पष्ट केले की, सुमारे १२,००० वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपले. यानंतर सुरू झालेल्या होलोसीन युगात ( होलोसीन (Holocene) हा भूवैज्ञानिक इतिहासातील सर्वांत अलीकडचा आणि सध्या चालू असलेला काळ आहे.) हायली गुब्बीच्या ( इथिओपियातील अफार प्रदेशात स्थित एक ज्वालामुखी उद्रेकाची कोणतीही नोंद नाही. दरम्यान, ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर राखेचे ढग "उष्णकटिबंधीय जेट स्ट्रीममध्ये, अरबी समुद्रावरून वायव्य भारत आणि पाकिस्तानकडे वेगाने पूर्वेकडे पसरत आहेत."सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये, ज्याची पडताळणी एएफपी त्वरित करू शकले नाही, त्यात पांढऱ्या धुराचा जाड स्तंभ उठताना दिसत आहे.
इथिओपियामधील स्थानिक प्रशासक मोहम्मद सैद यांनी सांगितले की, या नैसर्गिक उद्रेकामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या उद्रेकामुळे स्थानिक पशुपालकांच्या समुदायावर आर्थिक परिणाम होऊ शकतात. सैद यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची पूर्वी कोणतीही नोंद नव्हती आणि त्यांना रहिवाशांच्या उपजीविकेची भीती आहे आतापर्यंत कोणतेही मानवी जीवितहानी आणि पशुधन नष्ट झालेले नसले तरी, अनेक गावे राखेने माखली आहेत आणि परिणामी त्यांच्या प्राण्यांना चारा राहिलेलाच नाही." स्थानिक रहिवासी अहमद अब्देला यांनी एपीला सांगितले की, त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला आणि त्याला त्यांनी शॉक वेव्ह (धक्के) असे वर्णन केले. ते म्हणाले, "धूर आणि राखेसह अचानक बॉम्ब टाकल्यासारखे वाटले."