Epstein Files Elon Musk pudhari image
आंतरराष्ट्रीय

Epstein Files Elon Musk : अमेरिकेच्या राजकारणात भूकंप! मस्कचं श्रीमंतांना मुली पुरवणाऱ्या एपस्टीनच्या फाईल्समध्ये नाव?

२००७ मध्ये एपस्टीनचं नाव हे एका मोठ्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात समोर आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध आणि मसाजच्या नावावर त्यांचं शोषण केल्याचा आरोप होता.

Anirudha Sankpal

Epstein Files Elon Musk :

अमेरिकेतील अल्पवीयन मुलींच्या लैंगिक शोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या जेफ्री एपस्टनच्या फाईलमुळं अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. हाऊस ओव्हरसाईट कमिटीला मिळालेल्या ८ हजार ५०० पेक्षा जास्त पानांच्या दस्तऐवजानुसार सेक्स क्राईमसाठी दोषी ठरलेल्या अन् शिक्षा भोगलेल्या एपस्टीनचे अमेरिकेतील अनेक गर्भ श्रीमंतांशी आणि राजकारण्यांशी संबंध असल्याचं उघड झालं होतं.

या यादीत आता स्पेसेक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्कचं देखील नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचबरोबर टेक कंपन्यातील गुंतवणूकदार पीटर थिल आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी राहिलेल्या स्टीव बॅनन यांचं देखील नाव आहे असं समोर येत आहे.

कोण होता जेफ्री एपस्टीन

जेफ्री एपस्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याचं नाव अनेक काळ्या कृत्याशी जोडलं गेलं आहे. तो स्वतःला इनव्हेस्टमेंट बँकर म्हणवून घेत होता. त्याचं अमेरिकेतील अनेक हाय प्रोफाईल लोकांमध्ये उठ-बस होती. त्याची अमेरिकेत अनेक ठिकाणी मोठी संपत्ती होती. यात महागड्या रिसॉर्ट आणि हॉटेल्सचा देखील समावेश होता.

तो नव्वदीच्या दशकात अनेक राजनैतिक आणि बड्या व्यवसायिकांच्या सर्कलमध्ये दिसत होता. यात बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प, प्रिन्स अँड्र्यू, बिल गेट्स अशा मोठ्या नावांचा देखील समावेश होता. त्यामुळ एपस्टीन हे सतत चर्चेत होते.

मात्र २००७ मध्ये एपस्टीनचं नाव हे एका मोठ्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात समोर आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध आणि मसाजच्या नावावर त्यांचं शोषण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी त्याला १३ महिन्यांचा तुरूंगवास देखील झाला होता. त्याचं नाव लैंगिक शोषण अपराधी म्हणून नोंदवलं गेलं.

जेलमध्ये केली आत्महत्या

२०१९ मध्ये जेफ्री एपस्टीन याला पुन्हा एकदा अल्पवीय मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंगच्या आरोपात अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर केस चालली. दरम्यान, त्यानं जेलमध्येच आत्महत्या केली. जेफ्री एपस्टीनची डोनाल्ड ट्रम्प सोबत मैत्री होती. ट्रम्प यांनीच मी जेफ्री यांना १५ वर्षापासून ओळखतो ते चांगले व्यक्ती आहेत असा खुलासा केला होता.

दरम्यान, हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या सदस्यांनी जेफ्री एपस्टीन यांच्या संदर्भातील दस्तऐवजातील तिसऱ्या टप्प्यातील माहिती उघड केली. त्यात एपस्टीनची दैनंदिनी, फ्लाईट लॉग्स, फोन मॅसेज रेकॉर्ड्स आणि आर्थिक दस्तऐवजांचा समावेश आहे. अशी एकूण ८ हजार ५४४ पानं उघड झाली आहेत.

एलन मस्क यांचही नाव

या कागदपत्रात ६ डिसेंबर २०१४ या दिवशी एक कार्यक्रमाबाबतची माहिती मिळाली. यात मस्कने एपस्टीन आयलँडच्या प्रवासाचा उल्लेख आहे. ही नोट हातानं लिहिली आहे. मात्र मस्क एपस्टीन आयलँडला गेले होते का नाही याबाबत अजून अधिकृतरित्या खुलासा झालेला नाही. मात्र एपस्टीन यांच्या कागदपत्रात एलन मस्क यांचंही नाव आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मात्र मस्क यांनी हे आरोप खोटे असल्याचं ट्वीट केलं आहे.

याचबरोबर ट्रम्प समर्थक पीटर थिल आणि एपस्टीन यांनी एकत्र लंच केल्याचा देखील उल्लेख आहे. थिल हे सिलिकॉन व्हॅलीतील एक मोठा चेहरा मानले जातात. त्यांची पॉलिटिकल फंडिग देखील कायम चर्चेचा विषय असतो. तसंच एपस्टीन यांच्या २०१९ मधील अटकेपूर्वी त्यांनी स्टीव बॅनन यांच्यासोबत नाष्टा केल्याचा देखील उल्लेख आढळून आला आहे. बॅनन हे ट्रम्प यांच्या २०१६ च्या निवडणुकीतील सर्वात मोठे रणनितीकार होते.

याचबरोबर एपस्टीन यांच्या हिशाबाच्या डायरीत मसाजसाठी केलेल्या पेमेंटचा देखील उल्लेख आहे. यात ब्रिटीश राजघारण्यातील सदस्य प्रिन्स अँड्र्यू यांचं देखील नाव आहे.

या सर्व बड्या नावांचा उल्लेख एपस्टीन फाईलमध्ये आल्यामुळं अमेरिका तसंच ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT