पुढारी ऑनलाईन डेस्क: टेस्ला, स्पेसएक्स, एक्स, न्यूरोलिंक या कंपन्यांचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य असलेले एलन मस्क यांच्याविषयी काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. X (पूर्वीचे ट्विटर) वरून महिलांना मेसेज करून 'मुल जन्माला घालयचं का?' अशी ऑफर मस्क देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यांच्या संपर्कातील काही महिलांनी तर असाही दावा केला आहे की, पृथ्वीचा अंत होण्यापुर्वी मस्क यांना स्वतःचं सैन्य बनवायचं आहे. त्यामुळेच ते महिलांना गुप्त करारातून थेट शुक्राणूंची ऑफर करत आहेत. काय आहे हा सर्व प्रकार जाणून घेऊया... (Elon Musk Want to Build Legion of Children)
अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नल (Wall Street Journal - WSJ) या वृत्तपत्राने एलन मस्क यांच्या बाबतीतील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.
या रिपोर्टनुसार मस्क यांनी अऩेक महिलांना आपले शुक्राणू देण्याची ऑफर दिली आहे. सरोगसीचा वापर केला आहे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीय करार केले आहेत.
मस्क अनेकदा X (पूर्वीचं ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर महिलांना अपत्य जन्मासाठी संपर्क साधतात, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. WSJ चा दावा आहे की मस्कने अनेक महिलांना आपले शुक्राणू देऊ केले. तथापि, मस्क यांनी यावर प्रतिक्रिया देताना WSJ ला "गॉसिप वेबसाइट" असे संबोधले आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनल्यावर त्यांनी मस्क यांनाही ट्रम्प प्रशासनात घेतले. तेव्हापासून मस्क यांनी सरकारसाठी खर्च कपात करण्याचे उपाय सुचवले आहेत. पण एका गोष्टीत मात्र ते कपात करू इच्छित नाहीत ती गोष्ट म्हणजे मुलं जन्माला घालणं.
14 मुलांचे वडील असलेले मस्क स्वतःचे सैन्य उभारण्यासाठी X वरून महिलांशी संपर्क साधतात, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सध्या मस्क यांना चार महिलांपासून 14 अपत्ये झालेली आहेत. जस्टिन विल्सन, ग्राइम्स, शिवॉन झिलिस, अॅशली सेंट क्लेयर यांच्यापासून मस्क यांना ही अपत्ये झाली आहेत. दरम्यान, WSJ ने दावा केला आहे की, मस्क यांना इतरही महिलांपासून मुले असू शकतात.
तथापि, मस्क यांनी मात्र यावर "TMZ >> WSJ" अशी पोस्ट केली आहे. TMZ ही एक गॉसिप वेबसाइट आहे.
WSJ च्या रिपोर्टनुसार मस्क यांनी जपानमधील क्रिप्टो इन्फ्लुएन्सर टिफनी फॉंग हिला थेट संदेश पाठवून अपत्यासाठी विनंती केली होती. मस्क यांनी टिफिनीला X वर फॉलो केल्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आणि त्यानंतर तिने केवळ दोन आठवड्यांत 21000 डॉलर कमावले होते.
तथापि, फॉंगने मस्कचा प्रस्ताव नाकारला कारण तिला पारंपरिक कुटुंबपद्धतीत मूलं हवी होती. तिने हे प्रकरण तिच्या मैत्रिणींना सांगितले. त्या मैत्रिणींमध्ये अॅशली सेंट क्लेयर हिचाही समावेश होता. ॲशलीलाही मस्कपासून मुल झाल्याचा दावा केला आहे.
मस्क यांना हे कळल्यानतंर त्यांनी फॉंगला अनफॉलो केले, त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये घट झाली आणि कमाईवर परिणाम झाला.
2023 मध्ये मस्कने अॅशली सेंट क्लेयर हिला X वर फॉलो केल्यानंतर त्यांच्यात ओळख वाढली आणि त्यांची रिलेशनशिप सुरू झाली. सप्टेंबर 2024 मध्ये अॅशलीने मस्कच्या 13 व्या मुलाला जन्म दिला.
मात्र, हे प्रकरण गुपित ठेवण्यासाठी तिला $15 दशलक्षचा (सुमारे ₹125 कोटी) आर्थिक पॅकेज आणि दरमहा $100,000 देण्याचं आमिष दाखवून गोपनीयता करार करण्यास सांगितलं. पण अॅशलीने तो करार नाकारला आणि फेब्रुवारी 2025 मध्ये हे प्रकरण सार्वजनिक केलं.
वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, मस्क आणि अॅशली यांच्यातील संदेशांतून "अपोकॅलिप्स (विश्वाचा अंत) च्या आधी एक 'सेना' तयार करण्यासाठी मस्क इतर महिलांनाही सरोगेट म्हणून आणू इच्छित होता, हे उघड झालं.
अॅशलीने मस्क यांच्या मदतनीसाला (जॅरेड बिर्चॉल) फोनवर सांगितलं की, “माझ्या मुलाला असं अजिबात वाटता कामा नये की त्याला गुपित करून ठेवले आहे. मला वाटतंय की मी एका ‘हरम ड्रामामध्ये’ अडकले आहे. ('हरम' ही इस्लामी संकल्पना असून त्याचा अर्थ घरातील महिलांसाठीची राखीव जागा असा होतो.)
जस्टिन विल्सन-मस्क
जस्टिन विल्सन-मस्क ही एलन मस्क यांची पहिली पत्नी. त्या कॅनेडियन लेखिका आहेत. दोघांनी सन 2000 मध्ये लग्न केले. त्यांचा घटस्फोट 2008 साली झाला. त्यांना 5 अपत्ये आहेत. नेव्हाडा अलेक्झांडर मस्क हे त्यांचे पहिले मुल, पण 10 आठवड्याचा असताना SIDS मुळे त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर मुलगा ग्रिफिन मस्क, आणखी एक मुलगा Xavier Musk जो नंतर जेंडर ट्रान्सप्लँटद्वारे मुलगी झाला. तिचे नाव आता व्हिवियन जेना विल्सन असे आहे. तिने आईचे आडनाव घेतले आहे. त्यानंतर या दाम्पत्याला IVF द्वारे काय (Kai), सॅक्सन (Saxon) आणि डेमियन हे तिळे (ट्रिप्लेट) झाले.
टाटुला रायली
ब्रिटिश अभिनेत्री टाटुला रायली (Talulah Riley) ही मस्क यांची दुसरी बायको. त्यांनी सुरवातीला 2010 मध्ये लग्न केले. 2012 ला त्यांचा घटस्फोट झाला. 2013 मध्ये त्यांनी पुन्हा लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा पुन्हा घटस्फोट झाला.
ग्राईम्स
त्यानंतर कॅनेडियन संगीतकार आणि कलावंत ग्राईम्स (Grimes – मूळ नाव Claire Boucher) हिच्याशी मस्क 2018 ते 2021 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न केले नाही. ग्राइम्सपासून मस्क यांना तीन अपत्ये झाली.
सन 2020 मध्ये X Æ A-12 असे अवघड नाव असलेले (उच्चार: “Ex Ash A Twelve) मुल जन्माला आले. त्यानंतर Exa Dark Sideræl Musk (टोपण नाव- Y) या मुलाला दोघांनी सरोगसीद्वारे जन्म दिला. तर 2021 मध्ये Techno Mechanicus (टोपण नाव- Tau) याचा जन्म झाला.
शिवॉन झिलिस
त्यानंतर स्वतःच्याच Neuralink कंपनीची उच्चपदस्थ अधिकारी असलेल्या शिवॉन झिलिस (Shivon Zilis) हिच्याशी मस्क रिलेशनमध्ये होते. त्यांनी ते कधी उघड केले नाही. मात्र दोघांनी सरोगसीद्वारे मुलं जन्माला घातली. या दोघांना 2021 मध्ये जुळी मुले झाली. त्यानंतर 2024 मध्ये अर्काडिया आणि 2025 मध्ये सेल्डन ही मुले जन्माला आली.
ॲशली सेंट क्लेयर
त्यानंतर लेखिका ॲशली सेंट क्लेयर (Ashley St. Clair) हीने 2024 मध्ये मस्क यांच्या मुलाला जन्म दिल्याचा दावा केला. Romulus Musk असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. तथापि, मस्क यांनी अधिकृतरित्या हे मान्य केलेले नाही.
मस्क म्हणतात- जन्म दर घसरणे ही मानवजातीसाठी धोक्याची घंटा
दरम्यान, मस्क यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत या पुर्वीही अनेकदा उघड मते व्यक्त केली आहेत. जन्म दरातील घट ही मानवजातीच्या अस्तित्वाला धोका पोहोचवू शकते, असे ते म्हणतात.
मस्कचं खासगी आयुष्य चर्चेचा विषय
एलन मस्क सध्या सहा कंपन्या हाताळत आहेत. प्रचंड बिझी असूनदेखील त्यांचे खासगी आयुष्य नेहमी चर्चेत असते.
New York Times च्या रिपोर्टनुसार, मस्क यांनी 2024 मध्ये टेक्सासमध्ये 35 दशलक्ष डॉलर (सुमरो 295 कोटी रूपये) किंमतीचं 14400 चौरस फुटांचा अलिशान बंगला खरेदी केला होता. जिथे ते आपल्या मुलांसह आणि त्याच्या माजी महिला पार्टनर्ससह राहतात, असे सांगितले जाते.