अमेरिका इराणला धडा शिकवणार? दोन युद्धनौका अरबी समुद्रात दाखल

Truman And Vinson: 'विन्सन' आणि 'ट्रुमन ' या दोन्हीही विमानवाहू युद्धनौका
US Aircraft carrier Truman And Vinson
US Aircraft carrier Truman And VinsonPudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: इराणच्या अणुकार्यक्रमावर रोष व्यक्त करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव वाढवण्याची योजना आखली आहे. इराणने अमेरिकेसोबत थेट चर्चा करण्यास सुरुवातीला नकार दिला होता, मात्र नंतर बळजबरीने इराण चर्चेसाठी तयार झाला.

तथापि, त्यावेळी इराणने अंतिम प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार राखून ठेवल्याचे म्हटले होते. आता इराणला गुडघ्यावर आणण्यासाठी अमेरिकेने दोन विमानवाहू युद्धनौका USS Carl Vinson आणि USS Harry S. Truman मध्य पूर्वेत अरबी समुद्रात तैनात करून इराणभोवती सैनिकी घेराव घालण्यास सुरुवात केली आहे.

अण्वस्त्र तयार करणे कठीण नाही- इराणचा इशारा

दोन्ही देशातील चर्चेच्या पुढील टप्प्याच्या आधीच USS Carl Vinson युद्धनौका अरबी समुद्रात दाखल झाली आहे. पर्शियन खाडीकडे हालचाल सुरू झाली आहे. सोमवारी रात्रीपासून येमनमध्ये इराण-समर्थित हूती बंडखोरांवर अमेरिकेने हवाई हल्ले सुरु केले आहेत.

USS Truman आधीपासूनच येमेनमध्ये कारवाई करत आहे, मात्र आता दुसरा स्ट्राईक ग्रुप (Vinson) तैनात करून ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना गंभीर संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ट्रम्प यांनी सूचित केले आहे की, इराणने अणुकार्यक्रम थांबवण्यावर सहमती न दर्शविल्यास, अमेरिकन सैन्य हवाई हल्ले करून त्याच्या अण्विक स्थळे लक्ष्य करतील.

इराणनेही अमेरिकेला उत्तर देताना म्हटले आहे की, त्यांच्याकडे अस्त्र-स्तरीय युरेनियमचा साठा असून, अण्वस्त्र तयार करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.

दोन्ही युद्धनौका सज्ज

युरोपियन स्पेस एजन्सीच्या सॅटेलाइट इमेजनुसार, USS Carl Vinson ही युद्धनौका अरबी समुद्रात येमेनजवळील Socotra बेटाजवळ आहे. या युद्धनौकेसोबत USS Princeton (मिसाइल क्रूझर), USS Sterett आणि USS William P. Lawrence (डिस्ट्रॉयर) तैनात आहेत.

USS Truman आधीच येमेनमध्ये हालचाली करत असून आता Vinson मुळे तिला दुहेरी बळ मिळणार आहे. यूएस नेव्हीने F-35 आणि F/A-18 या लढाऊ विमानांची रात्रीच्या वेळी उड्डाणांची दृश्येदेखील प्रसिद्ध केली आहेत.

अमेरिकेच्या इतर लष्करी हालचाली

बहारीनमध्ये कार्यरत असलेली अमेरिकेच्या नौदलाची पाचवी तुकडी ती लाल समुद्र, अ‍ॅडनचा उपसागर आणि पर्शियन गल्फमध्ये लक्ष ठेऊन असते तिला सज्ज ठेवण्यात आला आहे.

याशिवाय, Diego Garcia तळावर अमेरिकेच्या B-2 स्टेल्थ बॉम्बर्स विमानांची मोठ्या प्रमाणात तैनानी केल्याचे समजते. ही विमाने खोल भूगर्भातील अणुस्थळांवर अचूक हल्ले करू शकतात.

इराणच्या सर्वोच्च नेत्याचा इशारा

पहिल्या फेरीनंतर इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खोमेनी यांनी देशाच्या उच्च अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केले होते. आपण या संवादाबाबत अतिषय आशावादीही राहू नये किंवा फारच निराशही होऊ नये. प्रक्रिया काळजीपूर्वक आणि रेड लाईन ओळखूनच पार पडली पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले.

चर्चेच्या पहिल्या फेरीस ओमानमध्ये सुरुवात झाली. अमेरिकेचे मध्यपूर्व प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी संवाद "सकारात्मक, रचनात्मक आणि आशाजनक" असल्याचे सांगितले.

आश्चर्य म्हणजे, खोमेनी यांनीसुद्धा पहिल्या टप्प्याचे वर्णन "योग्य दिशेने पाऊल" असे केले होते. तथापि, त्यांनी त्वरित इराणचे परराष्ट्रमंत्री शिष्टमंडळासह मॉस्कोला सल्लामसलतीसाठी पाठवले.

या घटनाक्रमामुळे अमेरिका-इराण तणाव पुन्हा उफाळून आला आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक लष्करी हालचालींनी संपूर्ण पर्शियन गल्फ परिसरात अस्थिरतेचे सावट गडद झाले आहे. येणाऱ्या दिवसांत दोन्ही देशांतील चर्चा यशस्वी होते की संघर्षाच्या दिशेने जाते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

US Aircraft carrier Truman And Vinson
अमेरिकेचा जोरदार दणका! चीनवर आता तब्बल 245 टक्के टॅरिफ; भारतावरही केला आरोप...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news