Elon Musk - X - Kekius Maximus Pudhari
आंतरराष्ट्रीय

Elon Musk यांनी नाव बदलताच क्रिप्टो मार्केटमध्ये भूकंप; 'Kekius Maximus' म्हणजे काय?

Elon Musk: सम्राट अवतारातील लूकमुळे मिम क्रिप्टो पुन्हा चर्चेत; 119 टक्के वाढ!

Akshay Nirmale

Elon Musk changed name on X to Kekius Maximus

वॉशिंग्टन : टेक उद्योजक एलन मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वरील डिस्प्ले नाव पुन्हा एकदा बदललं आहे. यावेळी त्यांनी स्वतःला ‘Kekius Maximus’ असं नाव दिलं असून, त्यांच्या प्रोफाईल फोटोमध्ये ते अश्वारूढ सम्राटाच्या लूकमध्ये दिसत आहेत.

त्या फोटोवर "Emperor Kekius Maximus" असं लिहिलं आहे. मस्क यांनी या नाव बदलामागचं कोणतंही स्पष्ट कारण दिलेलं नाही, पण यामुळे क्रिप्टोकरन्सी जगतात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

Kekius Maximus म्हणजे काय?

‘Kekius Maximus’ हे एक मिम-आधारित क्रिप्टोकरन्सी टोकन आहे. जे Ethereum आणि Solana यांसारख्या अनेक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर चालते.

"Kek" हा शब्द गेमिंग समुदायात "LOL" म्हणजे "laugh out loud" चा पर्याय म्हणून वापरला जातो.

काही ठिकाणी त्याचा संबंध alt-right विचारसरणीशी जोडला जातो.

"Kek" हे प्राचीन इजिप्शियन अंधाराची देवता म्हणूनही ओळखली जाते, जिचे डोके बेडकासारखे दाखवले जाते.

तर "Maximus" हा शब्द अनेकांना ग्लॅडिएटर चित्रपटातील Russell Crowe च्या 'Maximus Decimus Meridius' या पात्राची आठवण करून देतो.

मस्क यांच्या नावबदलाचा क्रिप्टो मार्केटवर परिणाम

मस्क यांनी नाव बदलून 'Kekius Maximus' केल्यानंतर या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य जवळपास 119 टक्क्यांनी वाढले आहे. डिसेंबर 2024 मध्येही त्यांनी याच नावाने नाव बदलले होते, त्यावेळी त्यांचा प्रोफाईल फोटो ‘Pepe the Frog’ या प्रसिद्ध मिमचा होता.

त्या वेळी टोकनची किंमत 497.56 टक्क्यांनी वाढून 0.005667 डॉलर इतकी झाली होती. परंतु त्यांनी मूळ नाव व फोटो परत केल्यावर त्याची किंमत 0.001165 डॉलरवर घसरली – यामुळे मिम-आधारित क्रिप्टोच्या अस्थिरतेचे स्पष्ट उदाहरण मिळाले.

‘Gorklon Rust’ हे मागील नाव काय होते?

याआधी मस्क यांनी ‘Gorklon Rust’ हे नाव ठेवले होते.

सोशल मीडिया युजर्सच्या मते, हे नाव ‘Grok’ (xAI चा एआय चॅटबॉट) आणि ‘Rust’ (एक प्रोग्रामिंग भाषा) यांचं मिश्रण आहे.

या नावबदलामुळे ‘GORK’ या टोकनची किंमतही 24 तासांत 100 टक्क्यांनी वाढली, पूर्वी ती2.62 रूपये होती, ती नंतर 5.24 रूपयांपर्यंत गेली.

यापुर्वी मस्क यांनी केलेले नावातील बदल

सन 2023 मध्ये मस्क यांनी Harry Bōlz असे नाव घेतले होते. हे एक विनोदी नाव असून त्याचा संदर्भ मीमशी आहे. सोशल मीडियात त्यामुळे विनोदी वातावरण झाले होते.

ऑक्टोबर 2022 मध्ये ट्विटर खरेदी करण्याच्या वेळेस मस्क यांनी Chief Twit असे हसण्यावारी नेणारे नाव घेतले होते. त्यावेळी त्यांनी ट्विटर मुख्यालयाच्या बाहेर सिंक घेऊन जातानाचा फोटो "Let that sink in" या कॅप्शनसह पोस्ट केला होता.

जानेवारी 2023 मध्ये त्यांनी गंमत म्हणून Mr. Tweet असे नाव घेतले होते. ट्विटर नेत्यांना परत नाव बदलू दिले नाही. या नावाने त्यांच्यावर अनेक मिम्स तयार झाले.

नाव बदलाचे कारण?

मिम कल्चरला उत्तर देण्यासाठी, काही क्रिप्टो किंवा टेक ट्रेंडला सूचित करण्यासाठी, विनोदी किंवा सायकोलॉजिकल मार्केटिंगसाठी किंवा फक्त मजेसाठी एलन मस्क नाव बदलतात असे दिसून आले आहे.

6 ते 7 वेळा तरी मस्क यांनी नाव आणि प्रोफाईल फोटो बदलले आहेत, आणि प्रत्येक वेळेस यामुळे सोशल मीडियावर चर्चा आणि क्रिप्टो मार्केटमध्ये चढ-उतार झालेला आहे.

एलन मस्क यांचे नाव बदलणे ही केवळ गंमत वाटत असली, तरी त्याचे परिणाम क्रिप्टो मार्केटवर थेट आणि मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

Kekius Maximus सारख्या टोकन्सची किंमत मस्कच्या एकाच कृतीने कित्येक पटींनी वाढते आणि नंतर तितक्याच वेगाने घसरते – यावरून क्रिप्टोच्या अस्थिरतेचा आणि ‘मिम कल्चर’च्या प्रभावाचाही अंदाज येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT