Donald Trump H-1B Visa Annual Fee :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून येणाऱ्या H-1B Visa धारकांना मोठा दणका दिला आहे. त्यांनी शुक्रवारी H-1B Visa धारकांना आता वर्षाला १ लाख डॉलर व्हिसा फी द्यावी लागणार अशी घोषणा केली आहे. याचबरोबर गर्भश्रीमंत व्यक्तींसाठी एक मिलियन डॉलर्सची गोल्ड कार्ड व्हिसा ही योजना देखील जाहीर केली आहे. मात्र याला कायदेशीर आव्हान देण्यात येईल अशी शंका आहे. या निर्णयाला अमेरिकन काँग्रेसकडून विरोध होत आहे.
मात्र जर हा निर्णय कायदेशीर कसोटीवर टिकला तर H-1B Visa व्हिसा धारकांना मोठी किंमत चुकवायला लागणार आहे. सध्या कुशल कामगारांसाठी व्हिसा फी ही २१५ डॉलर आहे. गुंतवणूकदारांसाठीच्या व्हिसाची फी देखील वर्षाला १० हजार ते २० हजार डॉलर्स इतकी वाढण्याची शक्यता आहे.
H-1B visa मिळवण्यासाठी किमान बॅचलर डिग्री आवश्यक आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळं आता टेक कंपन्यांना हाय स्कील जॉब्ज भरणं अडचणीचं जाण्याची शक्यता आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांनी सांगितलं की, परदेशातून येणारे हाय स्कील वर्कर हे वर्षाला ६० हजार डॉलर्सवर काम करण्यास तयार असतात. युएसमधील तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे कामगारांना जवळपास १ लाख डॉलर्सच्या वर पगार असतात. त्यांच्या तुलनेत परदेशातून येणारे कामगार हे कमी पगारात काम करण्यास तयार असतात.
हा निर्णय जाहीर करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, टेक कंपन्यांनी या निर्णयाचा विरोध करू नये. आपल्या देशात येणारे हे खरंच जास्त स्किल्ड आहेत याची खात्री करा आणि अमेरिकन कामगारांच्या बदली त्यांना घेऊ नका, आपल्याला कामगारांची गरज आहे. आपल्याला चांगल्या कामगारांची गरज आहे. असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितलं की या निर्णयाबाबत सर्व मोठ्या टेक कंपन्यांना विश्वासात घेतलं गेलं आहे. अमॅझोन, अॅपल, गुगल, मेटा यांच्या प्रतिनिधिंनी याबाबत त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मायक्रोसॉफ्टनं याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
कॉमर्स मंत्री म्हणाले की, वर्षाला ८५ हजार H-1B visas ची कॅप आहे. मात्र या निर्णयामुळं यापेक्षाही कमी अर्ज दाखल होती. कारण आता H-1B visas किफायतशीर राहिलेला नाही. जर तुम्हाला लोकांना ट्रेन करायचं आहे तर तुम्ही ते अमेरिकन लोकांना केलं पाहिजे. जर तुम्ही चांगले इंजिनिअर असाल तर तुम्हाला १ लाख डॉलर्स वर्षाला व्हिसा फी द्यावी लागेल. असं देखील लुटनिक म्हणाले.