Donald Trump Midterm Promises pudhari
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Midterm Promises: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 'लाडके अमेरिकन' योजना जाहीर; जिंकले तर मिळणार ५ हजार डॉलर्स

Anirudha Sankpal

Donald Trump Midterm Promises: रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेतील मीडटर्म निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. डल्लासमधून बुधवारी ९ सप्टेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी भारतात सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांच्या धरतीवर अमेरिकेत देखील मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर रिपब्लिकन्स मीडटर्म निवडणुकीत हाऊस आणि सिनेट दोन्हीमध्ये जिंकले तर प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला ५००० अमेरिकन डॉलर्स देण्याचे आश्वासन दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प डल्लासमधील प्रचारावेळी म्हणाले की, 'जर रिपब्लिकन्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युएस सिनेट दोन्हीकडे जिंकले तर मी तुम्हाला डिव्हिडंट देणार आहे. कारण आपली अर्थव्यवस्था शक्तीशाली आणि यशस्वी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकांना प्रत्येकी ५००० युएस डॉलर देण्यात येतील. मात्र त्यासाठी एक अट असेल हा डिव्हिडंट फक्त अमेरिकेतच खर्च झाला पाहिजे.'

ट्रम्प यांनी हा पैसा फक्त अमेरिकेत खर्च झाला पाहिजे. त्यांनी जे लोक कॅनडा, चीन किंवा जर्मनीत जाणार आहेत त्यांनी हा खर्च करू नये असे सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याला ट्रम्प डिव्हिडंट असं नाव दिलं आहे.

या योजनेचा डिव्हिडंट चेक मिळवण्यासाठी पात्रता काय असेल याबाबत मात्र स्पष्टता देण्यात आलेली नाही. ट्रम्प यांनी ही योजना अत्यंत उथळपणे घोषित केली आहे. अंदाजे अमेरिकेत जवळपास २४५ मिलियन प्रौढ अमेरिकन नागरिक जगभरात आहेत. न्यूजवीकनुसार या योजनेचा खर्च जवळपास १.२२ बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च येण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी ही लाडकी योजना जरी प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकांसाठी असली तरी त्यातून जवळपास २ मिलियन परदेशात राहणारे अमेरिकन लोकं यातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT