Trump vs Ilhan Omar file photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump: "गुडनाईट ब्रदर, चल आता झोपूया..."; ट्रम्प यांनी भरसभेत महिला खासदाराची केली नक्कल अन् अश्लील टीका

फ्लोरिडा येथील एका जाहीर सभेत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मुस्लिम महिला खासदार इल्हान ओमर यांच्या बोलण्याच्या शैलीची विचित्र नक्कल करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर टीका केली.

मोहन कारंडे

Donald Trump:

फ्लोरिडा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. फ्लोरिडा येथील एका जाहीर सभेत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मुस्लिम महिला खासदार इल्हान ओमर यांच्या बोलण्याच्या शैलीची विचित्र नक्कल करत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर टीका केली. ओमर यांनी आपल्या भावाशीच लग्न केल्याचा जुना आणि वादग्रस्त आरोप ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

'तिने स्वतःच्या भावाशी लग्न केले...'; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

यावेळी ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्या नागरिकत्वावर आणि अमेरिकेत येण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "मला वाटतं तिने तिच्या भावाशीच लग्न केलं आहे, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. खरं सांगायचं तर, ही एक गोड जोडी आहे, पण हे कृत्य कायद्याला धरून नाही." ट्रम्प यांनी एका जुन्या अफवेचा आधार घेत थेट खासदाराच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले.

भर सभेत मिमिक्री

ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी या कथित नात्याची थट्टा उडवत नक्कल केली. ट्रम्प मिश्किलपणे म्हणाले की, "डार्लिंग, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. गुडनाईट ब्रदर, चल आता आपण बेडवर झोपायला जाऊया." या विधानानंतर रॅलीत मोठी खळबळ उडाली. त्यानंतर लगेचच आपला द्वेष व्यक्त करत ट्रम्प म्हणाले, "ती किळसवाणी नाही का? मला तर तिचा चेहरा पाहणंही सहन होत नाही."

काय आहे 'ब्रदर' विधानामागच कारण?

ट्रम्प यांच्या या टिप्पणीमागे एक जुना वाद आहे. प्रत्यक्षात, अनेक कॉन्झर्व्हेटिव्ह गट दीर्घकाळापासून असा दावा करत आहेत की, इल्हान उमर यांनी त्यांच्याच भावाशी लग्न केले होते. ट्रम्प यांनी मुद्दाम 'ब्रदर' शब्दाचा वापर करून त्याच जुन्या वादाला पुन्हा फोडणी दिली आहे.

यानंतर ट्रम्प यांनी खासदार उमर आणि त्यांचा मूळ देश सोमालिया यावरही निशाणा साधला. सोमालिया हा एक 'सुंदर देश' असल्याचे उपरोधिकपणे म्हणत त्यांनी पुढे टीका केली की, तिथे ना सरकार आहे ना सैन्य; तिथे फक्त गरिबी, प्रदूषण आणि गुन्हेगारीचे साम्राज्य आहे. इल्हान उमर यांच्यावर वैयक्तिक टीका करताना ट्रम्प म्हणाले की, "उमर अशा देशातून आल्या आहेत ज्याची स्थिती जगात सर्वात वाईट आहे. त्या अमेरिकेत येऊन येथील लोकांना देश कसा चालवायचा हे शिकवत आहेत."

संपत्तीवरूनही केले आरोप

ट्रम्प यांनी एका कथित घटनेचा उल्लेख करत सांगितले की, गेल्या महिन्यात उमर यांनी आपली संपत्ती ३८ मिलियन डॉलर जाहीर केली होती. मात्र, जेव्हा तपास यंत्रणांनी याची चौकशी सुरू केली, तेव्हा अचानक त्यांची संपत्ती ८०,००० डॉलरपेक्षाही कमी झाली. उमर यांनी याला केवळ 'अकाउंटिंगची चूक' असल्याचे म्हटले होते. अशा लोकांचे संपूर्ण आयुष्यच फसवणूक आणि घोटाळ्यांवर आधारित असते. अशा लोकांना आपण देशाबाहेर काढले पाहिजे, असे ट्रम्प म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT