हल्‍ल्‍यानंतर प्रथमच आज ( दि. १६) डोनाल्ड ट्रम्परिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले. Twitter
आंतरराष्ट्रीय

हल्‍ल्‍यानंतर ट्रम्‍प प्रथमच 'रिपब्लिकन'च्‍या अधिवेशनात सहभागी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रविवारी ( दि.१४) पेनसिल्व्हेनिया राज्यात गोळीबार झाला. ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्‍ल्‍यानंतर प्रथमच आज ( दि. १६) रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते सहभागी झाले.

अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ट्रम्प यांची अधिकृतपणे निवड

डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. रिपब्लिकन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कानाला पट्टी बांधून ते सहभागी झाले. या वेळी ट्रम्प मैदानात आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

यावेळी ली ग्रीनवुडने त्यांचे 'गॉड ब्लेस द यू.एस.ए.' केले. हे गीत गायले. ट्रम्प यांची मुले एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्‍युनिअरर हेही यावेळी उपस्‍थित होते. अधिवेशनाच्या ठिकाणी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मिलवॉकी येथे औपचारिकपणे अध्‍यक्षपदासाठीचे नामांकन स्वीकारणार

रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये प्रतिनिधींची मते मिळवल्यानंतर प्रतिनिधींनी डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून औपचारिकपणे नामनिर्देशित केले. त्यांनी नामांकनानंतर तेथे उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले नाही, ते अधिकृत उमेदवार म्हणून 18 जुलै रोजी मिलवॉकी येथे औपचारिकपणे नामांकन स्वीकारतील. यावेळी ते भाषण देखील करणार आहेत. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहे.

हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात

ट्रम्प यांना पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा नामांकन देण्यात आले आहे. ट्रम्प यांना दिलेला धोका लक्षात घेऊन अधिवेशनाच्या ठिकाणी हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT