आंतरराष्ट्रीय

Paxlovid : कोविडवरील गोळीची निर्मिती करणाऱ्या ‘फायझर’वर देशांतर्गत कंपन्यांचे लक्ष

backup backup

जागतिक पातळीवर कोविड-१९ वरील उपचारामध्ये आता तोंडावाटे घेतल्या जातील अशा गोळ्या निर्माण करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे देशांतर्गत असणाऱ्या सिप्ला, डाॅ. रेडीज, सनफार्मा आणि बीडीआर फार्मा या कंपन्यां फायझर कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या 'पॅक्सलोविड' (Paxlovid) या नव्या औषधावर लक्ष ठेवून आहेत. कोविडववरील ही औषधे (अँटीव्हायरल) देशातच तयार होतील आणि जागतिक कंपन्यांच्या किमतीच उपलब्ध होतील, याला जास्त महत्व देण्यात आलं आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात कोरोना पोहोचल्यामुळे कोविडवरील तोंडावाटे घेण्यात येणारे औषधं (Paxlovid) ही एक मोठी बाजारपेठ असू शकते. त्यामुळे बहुतेक देशांतील स्थानिक पातळीवरचा विचार करता सौम्य आणि मध्यम लक्षण असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरेल, तसेच गेमचेंजरही असू शकेल. फायझर कंपनीने जाहीर केलं आहे की, पाॅझिटिव्ह रुग्णांवर या गोळ्यांनी सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. यामुळे हाॅस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे.

अमेरिकेत लवकरच्या या गोळ्यांच्या आपतकालीन वापरासाठीची अधिकृत डेटा सादर करण्याची योजना आहे. फायझर कंपनी कोरोनावरील उपचारांच्या नियमांच्या चौकटीत राहून लवकरात लवकर आणि लोकांना परवडेल असं तोंडावाटे घेता येईल असे औषध बाजारात आणण्याच्या विचारात आहे, असं कंपनीच्या प्रतिनिधीने माध्यमांना सांगितले.

कोविडवरील गोळ्या निर्माण करणारा इंग्लंड पहिला देश

इंग्लंडमध्ये कोरोना उपचाराकरीता महत्वाच्या आणि उपयुक्त समजल्या जाणाऱ्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनावरील ही गोळी जगातील पहिली गोळी आहे. १८ वर्षांच्या पुढील लोकांना कोरोमा संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना ही होळी दिवसातून तीन वेळा घ्यावी लागणार आहे.

कोरोनावर गोळीद्वारे उपचार होऊ शकतात, हे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे. या गोळीबद्दल असं सांगण्यात आलं आहे की, अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते. रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल", असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT