Delta Airlines  x
आंतरराष्ट्रीय

Delta Airlines: विमानातून उतरल्याबद्दल प्रवाशाला मिळाले 2.5 लाख रूपये

Delta Airlines: डेल्टा एअरलाईनच्या प्रवाशाचा आश्चर्यकारक अनुभव झाला व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

Delta Airlines Flight Passenger Gets Rs 2.5 Lakh To Get Off

वॉशिंग्टन: अमेरिकेतील डेल्टा एअरलाईन्सच्या एका विमानातून उतरल्याबद्दल एका प्रवाशाला चक्क 3000 डॉलर्स म्हणजे सुमारे 2.5 लाख रूपये मिळाले आहेत.

अमेरिकेतील एका गजबजलेल्या विमानतळावर घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका ऑफरमुळे हे सर्व घडले आहे.

हा स्पेशल अनुभव एका Reddit युजरने शेअर केला आहे. ही घटना 21 एप्रिल 2025 रोजी घडली.

सोमवारी 21 एप्रिल रोजी सर्वाधिक बिझी असलेल्या अमेरिकेतील एका विमानतळावर एक प्रवासी 7.50 वाजता शिकागोहून सिएटलला जाणाऱ्या डेल्टा एअरलाईन्सच्या फ्लाईटवर 7.50 ला चढला होता. हे विमान 35000 फुटांवरून उड्डाण करण्यास सज्ज होते.

घोषणा झाली अन्‌ त्याने हात उंचावला

पण इतक्यात एक गेट एजंट फर्स्ट क्लासच्या पुढे आला आणि त्याने सांगितले की, आम्हाला इंधन संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे. त्याच्या निराकरणासाठी दोन प्रवाशांना विमानातून उतरावे लागणार आहे.

तर विमानातून कुणी दोन प्र‍वासी स्वतःहून उतरायला तयार आहेत का? त्यांना भरपाई म्हणून 3000 डॉलर दिले जातील. आणि त्यानंतर काही सेकंदातच, या प्रवाशाने हात उंचावला.

कसे मिळाले 2.5 लाख रुपये?

त्या प्रवाशाने म्हटले आहे की, "पूर्णपणे कळायच्या आधीच मी हात हवेत उंचावला होता. मी एक क्षणही गमावला नाही. इतर कोणी माझ्याआधी हात वर करणे मला आवडले नसते.

अर्थातच त्या प्रवाशाचा निर्णय त्याला धनलाभ देऊन गेला. त्या प्रवाशाला आणि आणखी एका प्रवाशाला प्रत्येकी दोन क्रेडिट्स देण्यात आले एक 2000 डॉलर आणि दुसरे 1000 डॉलर. कारण डेल्टा एअरलाईन्स एकाच व्हाउचरमध्ये 2000 डॉलरपेक्षा जास्त रक्कम देत नाही.

हे क्रेडिट्स, डेल्टा चॉइस बेनिफिट्स पोर्टलद्वारे रिडीम केले जाऊ शकतात. याशिवाय ते अमेझॉन, एयरबीएनबी आणि इतर ब्रॅण्डसाठी गिफ्ट कार्ड्स मध्ये रूपांतरित केली जाऊ शकतात.

एअरलाईनने इतरही ऑफर दिल्या होत्या...

एअरलाईनने गेटवर या घोषणा करण्यापूर्वी देखील काही ऑफर दिल्या होत्या. एका आधीच्या उपकरण बदलामुळे 22 इतर प्रवाशांनी 1700 डॉलर (1.4 लाख रुपये) ऑफर स्वीकारली होती आणि नंतरच्या फ्लाईट वर बदल करून घेतला होता. पण ज्यांनी आधीच फ्लाईट पकडली होती त्यांना हे माहित नव्हतं.

इतर प्रवाशांनाही आले असे अनुभव...

ही पोस्ट तत्काळ व्हायरल झाली. त्यावर अनेकांचे रिप्लायही आले. आणखी एका युजरनेही त्याला 3000 डॉलर मिळाल्याचे सांगितले.

आणखी एकाने म्हटले आहे की, काही वर्षांपुर्वी ख्रिसमससाठी सॉल्टलेक सिटिला जात असताना हिमवादळामुळे अनेक उड्डाणे रद्द झाली होती. त्यावेळी त्यांनी प्रत्येक प्रवाशाला 5000 डॉलर देण्याची ऑफर केली होती. त्यावेळी 130 हून अधिक लोकांना पैसे दिले होते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT