

Putin's Secret Son
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा कथित गुप्त मुलगा इव्हान व्लादिमीरोविच पुतिन याचे पहिले फोटो नुकतेच ऑनलाइन लीक झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
VChK-OGPU या रशियन अॅण्टी-क्रेमलिन टेलिग्राम चॅनेलने हे फोटो शेअर केले असून, या मुलाचा चेहरा पुतिन यांच्या लहानपणीच्या सोव्हिएत काळातील फोटोशी मिळताजुळता आहे, असेही म्हटले आहे.
10 वर्षांचा इव्हान (Ivan Vladimirovich) हा पुतिन आणि त्यांची दीर्घकालीन जोडीदार आणि माजी ऑलिंपिक जिम्नॅस्ट अलिना काबायेवा यांचा मुलगा असल्याचे म्हटले जात आहे.
इव्हानचा जन्म सन 2015 मध्ये स्वित्झर्लंडमधील लुगानो येथील रुग्णालयात झाला होता, अशी माहिती Dossier Centre ने दिली आहे.
VChK-OGPU चॅनेलने म्हटले आहे की, "आम्हाला रशियातील सर्वात गुप्त आणि कदाचित सर्वात एकाकी मुलाचा फोटो मिळाला आहे. हा मुलगा म्हणजे इव्हान व्लादिमीरोविच पुतिन आहे.
तो इतर मुलांशी फारसा संवाद साधत नाही. त्याचा सर्व वेळ अंगरक्षक, शिक्षिका आणि खास प्रशिक्षकांसोबत जातो."
शेअर करण्यात आलेल्या दोन हायरेझोल्यूशन फोटोंमधील एकामध्ये इव्हान पारंपरिक रशियन पोशाखात दिसतो, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो आपल्या आई अलिना काबायेवा यांच्यासोबत दिसतो.
या फोटोमध्ये दोघांचे चेहरे अंशतः धुसर करण्यात आले आहेत, मात्र इव्हानचा चेहरा स्पष्टपणे पुतिन यांच्या बालपणाशी साधर्म्य दर्शवतो.
गुप्त जीवनशैली आणि आवडीनिवडी
इव्हानचे आयुष्य अत्यंत गुप्त राखले गेले आहे. त्याचा सार्वजनिक जीवनाशी फारसा संबंध नाही. तो डिस्ने कार्टून पाहण्याचा शौकीन आहे, मात्र पुतिन यांना ते आवडत नसल्याचेही एका अहवालात नमूद केले आहे. त्याला आईस हॉकीचेही विशेष आकर्षण आहे आणि तो स्वतः एक उत्कट हॉकी खेळाडू आहे.
इव्हानला एक लहान भाऊ व्लादिमीर ज्युनियर असून, त्याचा जन्म 2019 मध्ये मॉस्कोमध्ये झाला. हे दोघेही कथितपणे मॉस्कोजवळील आलिशान हवेलीत राहतात, जिथे त्यांच्यासाठी खास प्रशिक्षक, शिक्षिका आणि सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत.
अलिना काबायेवा आणि पुतिन यांच्यातील संबंधांविषयी अनेक वर्षांपासून तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आजपर्यंत या दोघांनीही याविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
काबायेवा सार्वजनिक जीवनात फारशी दिसत नाहीत आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही त्या मौन बाळगतात. त्यांच्याकडे पुतिन यांच्याशी संबंधित आणखी दोन मुली असल्याची माहिती आहे.
पुतिन यांना त्यांची माजी पत्नी ल्युडमिला यांच्यापासून दोन मुली आहेत, तसेच त्यांची एक्स मैत्रिणी स्वेतलाना क्रिवोनोगिख यांच्यासोबत एक गुप्त कन्या झाली आहे. तिचे नाव एकतेरिना असल्याचे बोलले जाते.
स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षेच्या छायेत?
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला, पुतिन यांनी काबायेवा आणि त्यांच्या मुलांना स्वित्झर्लंडमध्ये हलवल्याचा दावा 2022 मध्ये Page Six या माध्यमाने केला होता. हे कुटुंब स्वित्झर्लंडमधील एका खासगी आणि उच्च सुरक्षायुक्त शॅलेमध्ये वास्तव्य करत होते, असेही या वृत्तात नमूद केले गेले होते.