प्रातिनिधिक छायाचित्र  AI Photo
आंतरराष्ट्रीय

Cockroach Milk | तुम्हाला देईल सुपरपॉवर! गाय-म्हैशीच्या दुधापेक्षाही या दुधात अधिक प्रोटिन

अमेरिकेत या दुधापासून बनवलेल्या आईसक्रीमला मागणी

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: दुधाला पुर्णान्न म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे त्यातील पौष्टिक घटक. तान्ह्या बाळाची सुरवातीच्या वर्षातील वाढ ही आईच्या दुधावरच होत असते. नंतर आणि मोठे होईल, तसे गाय-म्हैशीचे दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थांवर आपले भरण-पोषण होत असते. गाय-म्हैशीचे दूध पौष्टिक म्हणून त्याचे सेवन केले जाते. पण आता एका नव्या संशोधनानुसार चक्क झुरळाचे दूध हे गाय-म्हशीच्या दुधापेक्षाही तीन ते चार पट अधिक पौष्टिक असल्याचे समोर आले आहे. (Cockroach Milk)

वाचून आश्चर्य वाटेल किंवा एखाद्या सायफाय कादंबरीचे कथानक वाटू शकेल, पण हे खरे आहे. सध्या जगातील काही प्रगत देशात कॉक्रोच मिल्क म्हणजेच झुरळाचे दूध हे 'ट्रेंडिंग'आहे. कॉक्रोच मिल्क हे 'सुपरफूड' मानले जात आहे. आजघडीपर्यंत शोधले गेलेले उत्तम नैसर्गिक पूरक अन्न म्हणून या कॉक्रोच मिल्ककडे पाहिले जात आहे. प्रगत देशात इंटरनेटवरही कॉक्रोच मिल्क हे 'न्यू ऑब्सेशन' ठरत आहे.

संशोधकांच्या मते, हे दूध पोषकतत्त्वांनी समृद्ध असून पारंपरिक डेअरीच्या दूधापेक्षा हे दूध तीन ते चार पट अधिक पोषक आहे.

कसे तयार होते कॉक्रोच मिल्क?

स्टेम सेल बायोलॉजी अँड रीजनरेटीव्ह मेडिसिन इन इंडिया या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार झुरळाची एक विशिष्ट प्रजाती स्वतःच्या पिलांना पाजण्यासाठी हे दूध तयार करते. पॅसिफिक बीटल असे झुरळाच्या प्रजातीचे नाव आहे. झुरळाची ही प्रजाती Diploptera punctate या नावानेही ओळखली जाते. प्रथिनांनी समृद्ध असलेल्या या दुधात महत्वपूर्ण असे ॲमिनो ॲसिड्स, हेल्दी फॅट्स आणि नेहमीच्या दुधापेक्षा तीनपट अधिक ऊर्जा मिळेल, असे घटक आहेत.

जर्नल ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टॅलोग्राफीच्या मते, या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे, इतर झुरळांप्रमाणे ही झुरळे अंडी न घालता ही थेट त्यांच्या पिलांना जन्म देतात. या काळात मादी झुरळ पिलांच्या पोषणासाठी पिवळसर रंगाचे दूध निर्माण करते.

संशोधकांनी असे आढळले आहे की, हे दूध पिल्लांच्या पोटात गेल्यानंतर क्रिस्टल्स तयार करते. ज्यामध्ये अमिनो ॲसिड्स, हेल्दी फॅट्स आणि ग्लुकोज असते. ऊर्जा निर्माण करण्यात आणि पेशींना पुनरुज्जीवित करण्यासाठी हे घटक महत्वाची भूमिका बजावतात. या दुधात म्हशीच्या दुधाच्या तुलनेत तीन पट अधिक कॅलरीज असतात. यामुळे, अन्न वैज्ञानिक आणि संशोधक याकडे नवीन आणि शाश्वत अन्न पर्याय म्हणून पाहत आहेत.

१० हजार झुरळांपासून एक लिटर दूध

अर्थात सध्यातरी या झुरळांमधून दूध काढण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे या दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणेही अशक्य आहे. १० हजार झुरळांपासून एक लिटर दूध तथापि, या दुधाचा पौष्टिक गुणधर्म पाहता भविष्यात फूड टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अमेरिकेत या कॉक्रोच मिल्कपासून बनवलेल्या आईसक्रीमला मोठी मागणी आहे. त्यांची किंमतही अधिक असल्याचे सांगितले जाते.

आता, महत्वाचा मुद्दा म्हणजे या दुधाचा आपण अन्नात समावेश करणार का? कारण एरवी झुरळ हा किटक त्याच्या रंगरूपावरून सहजासहजी कुणाला आवडत नाही. त्यामुळे त्याच्या दुधाला जेवणाच्या थाळीत स्थान देणे आणि हे दूध सेवन करणे भारतीयांना कितपत आवडेल हे सांगता येणार नाही. पण भविष्यात हे दूध जर सुपरफूड म्हणूनच नावारूपाला येणार असेल तर मात्र त्याच्या सेवनाला पर्याय नसेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT