आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून टिपले उभ्या विजेचे दुर्मीळ दृश्य

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून टिपले उभ्या विजेचे दुर्मीळ दृश्य
File Photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील एका अंतराळवीराने टिपलेल्या दुर्मीळ छायाचित्रात 50 मैलांपेक्षा (80 कि.मी.) अधिक उंचीवर झेपावणार्‍या ‘गिगांटिक जेट’ किंवा सरळ उभ्या स्थितीत लखलखणार्‍या विजेचा विस्मयकारक क्षण कैद करण्यात आला आहे. हे आश्चर्यकारक छायाचित्र 19 नोव्हेंबर 2024 रोजी ‘आयएसएस’ मधील एका अज्ञात अंतराळवीराने घेतले; परंतु ‘नासा’ किंवा कोणत्याही अंतराळ संस्थेने ते लगेच प्रसिद्ध केले नाही. मात्र, फ्रँकी ल्यूसेना या फोटोग्राफरने gateway to astraunu photograph of earth या वेबसाईटवर ही छायाचित्रे शोधून काढली आणि Spaceweather.com वर शेअर केली. 26 फेब्रुवारी 2025 रोजी या छायाचित्रांनी अधिकृत प्रसिद्धी मिळवली.

ल्यूसेना यांनी सांगितले की, आयएसएस डेटाबेसमध्ये पाहिल्यानंतर त्यांना विजेच्या चार वेगवेगळ्या छायाचित्रांचा मागोवा मिळाला. मात्र, फक्त एका छायाचित्रामध्ये विशिष्ट ‘गिगांटिक जेट’ दिसून आला. आयएसएसच्या त्या वेळी असलेल्या स्थानानुसार, ही घटना अमेरिकेच्या न्यू ऑर्लिन्सच्या किनार्‍याजवळ घडली असावी. हे प्रचंड विजेचे झोत थंडरस्टॉर्ममधून वरच्या वातावरणात झेपावतात, जेव्हा ढगांतील विद्युत चार्ज थोड्या काळासाठी उलट्या क्रमाने मांडले जातात. नायट्रोजनच्या जास्त प्रमाणामुळे हे झोत निळसर रंगाचे दिसतात आणि साधारण एका सेकंदापेक्षा कमी काळ टिकतात. साधारणपणे, गिगांटिक जेट वातावरणाच्या आयनोस्फिअरपर्यंत पोहोचतात, जो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 50 मैल (80 कि.मी.) उंच आहे आणि तिथे सूर्यप्रकाशामुळे विद्युतभारीत झालेले कण असतात. म्हणूनच या घटनेला ‘पृथ्वीवरील सर्वात उंच वीज’ असेही म्हटले जाते. नवीन टिपलेल्या विजेचे नेमके उंचीमापन अजून स्पष्ट झाले नाही; पण हे छायाचित्र या अद्भुत नैसर्गिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news