चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेच्या ट्रेझरी विभागातील डॉक्युमेंट्सची चोरी केली आहे. (US Treasury Department)
आंतरराष्ट्रीय

मोठी घटना! चिनी हॅकर्सनी भेदली अमेरिकेची सायबर सुरक्षा, डॉक्युमेंट्सची चोरी

Chinese hackers breach US treasury : सुरक्षा भंग प्रकरणी प्रशासन सतर्क

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेची (Chinese hackers breach US treasury) सायबर सुरक्षा भेदली आहे. ट्रेझरी विभागाच्या संगणक सुरक्षेचा या महिन्यात भंग झाला. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ही मोठी घटना असल्याचे सांगत चिनी हॅकर्सनी डॉक्युमेंट्सची चोरी केली असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

अमेरिकेतील खासदारांना पाठवलेल्या एका पत्रानुसार, हा सुरक्षेचा भंग एका थर्ड पार्टी सायबर सुरक्षा सेवा देणारी कंपनी बियॉन्डट्रस्टच्या माध्यमातून झाला आहे. हॅकर्स BeyondTrust द्वारे वापरण्यात येत असलेल्या एक महत्वपूर्ण सुरक्षेपर्यंत पोहोचले. जिथे त्यांना अवर्गीकृत दस्तऐवजांचा ॲक्सेस मिळाला.

या पत्रानुसार, हॅकर्सने ट्रेझरी डिपार्टमेंटल ऑफिसेस (DOs) यूजर्संच्या रिमोट तांत्रिक साहाय्य प्रदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लाउड आधारित सेवेमध्ये प्रवेश करण्यासाठी वेंडरद्वारे वापरल्या जाणाऱ्या कीमध्ये प्रवेश मिळवला. या कीमध्ये प्रवेश केल्याने हॅकर्सला सेवेची सुरक्षा ओव्हरराइड करता आली. त्यांनी काही ट्रेझरी डिओ यूजर्संच्या वर्कस्टेशन्समध्ये दूरस्थपणे प्रवेश केला आणि काही अवर्गीकृत दस्तऐवजांचा ॲक्सेस मिळवला."

सुरक्षा भंग प्रकरणी सतर्क, सायबर सुरक्षा एजन्सी, FBI कडून तपास

ट्रेझरी डिपार्टमेंटकडून याबाबत सांगण्यात आले आहे की ८ डिसेंबर रोजी BeyondTrust द्वारे झालेल्या सुरक्षा भंग प्रकरणी सतर्क करण्यात आले होते. ते यूएस सायबर सिक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्टर सिक्युरिटी एजन्सी आणि एफबीआय (FBI) च्या सहकार्याने हॅकच्या परिणामाचे मूल्यांकन करत आहेत.

चीनने हॅकिंगचा दावा फेटाळला

ट्रेझरी अधिकाऱ्यांनी हॅकिंगच्या घटनेबाबात अधिक तपशील दिलेली नाही. वॉशिंग्टनमधील चीन दूतावासाच्या प्रवक्त्याने हॅकिंगचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, चीनचा कोणत्याही तथ्यात्मक आधाराशिवाय अमेरिकेच्या चीनविरूद्धच्या बदनामीकारक आरोपांना विरोध राहील."

BeyondTrust ने काय म्हटले?

जॉर्जियाच्या जॉन्स क्रीक येथे स्थित असलेल्या BeyondTrust च्या प्रवक्त्याने रॉयटर्सला एका ईमेलद्वारे सांगितले की, ''कंपनीला डिसेंबर २०२४ च्या सुरुवातीस एक सुरक्षेशी संबंधित घटना निदर्शनास आली होती. त्यावर उपाययोजना करण्यात आली. ज्यात रिमोट सपोर्ट प्रोडक्टचा समावेश आहे. BeyondTrust ने मर्यादित संख्येने सहभागी असलेल्या ग्राहकांना सूचित केले आणि कायद्याची अंमलबजावणी अधिसूचित करण्यात आली'', असे प्रवक्त्याने सांगितले. "BeyondTrust तपासात सहकार्य करत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT