china urine eggs coffee file photo
आंतरराष्ट्रीय

Viral News: लघवीत उकडलेल्या अंड्यांपासून तयार होतेय कॉफी; पिण्यासाठी लोक का झालेत वेडे? पाहा किती आहे किंमत?

china urine eggs coffee: खाद्यसंस्कृतीच्या नावाखाली चीनमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच चर्चेत असतात, पण सध्या एका विचित्र आणि किळसवाण्या कॉफीची चर्चा सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

china urine eggs coffee

बीजिंग: खाद्यसंस्कृतीच्या नावाखाली चीनमध्ये नवनवीन प्रयोग नेहमीच चर्चेत असतात, पण सध्या एका विचित्र आणि किळसवाण्या कॉफीची चर्चा सुरू आहे. चीनमधील एका कॅफेने लहान मुलांच्या लघवीमध्ये उकडलेली अंडी घालून कॉफी विकण्यास सुरुवात केली. कॅफेची ही अजब-गजब डिश पौष्टिक असल्याचा दावा केला जातो. मात्र हा प्रकार व्हायरल होताच लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील एका कॅफेने ही अनोखी 'यूरिन एग कॉफी' लाँच केली होती. या कॉफीची किंमत सुमारे २८ युआन (अंदाजे ३०० ते ३५० रुपये) इतकी ठेवण्यात आली होती. या कॉफीचे वैशिष्ट्य म्हणजे, यात वापरली जाणारी अंडी १० वर्षांखालील मुलांच्या लघवीमध्ये भिजवून आणि उकडून तयार केली जात असत. त्यानंतर ही अंडी रोस्ट करून 'अमेरिकानो' कॉफीवर टाकली जात. विशेष म्हणजे, या कॅफेमध्ये अशा कॉफीचे १०० हून अधिक कप विकले जात होते.

अंधश्रद्धा की परंपरा?

हा अजब प्रकार चीनच्या डोंगयांग भागातील एका जुन्या परंपरेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. तिथे 'यूरिन एग्स' हे एक पारंपरिक स्नॅक मानले जाते. यामुळे शरीराला थंडावा मिळतो, उष्माघातापासून बचाव होतो आणि शरीरातील ऊर्जा वाढते, अशी स्थानिक लोकांची धारणा आहे. या डिशला स्थानिक स्तरावर 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' असा दर्जाही मिळाला आहे.

डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

स्थानिक परंपरा कितीही जुनी असली, तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, लघवी हा मानवी शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे. त्यात कोणतेही पोषक घटक नसतात. अशा प्रकारे पदार्थ सेवन केल्याने आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT