Tourist Juliana Marins falls into volcano Pudhari
आंतरराष्ट्रीय

Tourist falls into volcano | ब्राझिलची ट्रॅव्हलर जुलियाना जीवंत ज्वालामुखीत कोसळली; ड्रोनमध्ये जिवंत दिसली पण...

Tourist falls into volcano | इंडोनेशियातील माऊंट रिंजानीतील घटना; गाईड मध्येच सोडून गेल्याचा बहिणीचा आरोप...

Akshay Nirmale

Tourist Juliana Marins Brazilian backpacker falls into Indonesia volcano Mount Rinjani accident

लॉम्बोक (इंडोनेशिया) : इंडोनेशियामधील सक्रिय ज्वालामुखी माउंट रिंजानीच्या परिसरात ट्रेकिंग करताना खड्ड्यात पडलेल्या ब्राझिलच्या 26 वर्षीय जुलियाना मारीन्स हिचा मृतदेह अखेर शोधमोहीमेअंती सापडला.

शनिवारी ती हरवली होती आणि सोमवारी ड्रोन फुटेजमध्ये ती जिवंत असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, खराब हवामान, धुके आणि कठीण भूगोलामुळे तिच्यापर्यंत पोहोचणं अवघड झालं.

नेमकं काय घडलं?

मारीन्स ही ब्राझिलच्या निटेरॉय, रिओ दि जानेरोजवळील शहरातील रहिवासी आणि एक पब्लिसिस्ट होती. ती सध्या आग्नेय आशियात फिरत (बॅकपॅकिंग) होती आणि आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स व इंडोनेशियातील प्रवासाचे फोटो शेअर करत होती.

शनिवारी माउंट रिंजानी ट्रेक दरम्यान तिने थांबा घेण्याची विनंती केली. मात्र, तिच्यासोबतचा स्थानिक ट्रेक गाईड पुढे निघून गेला, असा आरोप तिची बहीण मारीआना मारीन्स हिने ब्राझिलच्या Fantástico टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला. काही वेळानंतर गाईड परत आला, तेव्हा जुलियाना खड्ड्यात कोसळलेली होती.

ड्रोनने टिपला होता जिवंत क्षण

स्थानीय अधिकाऱ्यांनी सोमवारी तिला ड्रोनच्या सहाय्याने जिवंत पाहिलं होतं. तिने हालचाल केल्याचं आणि मदतीसाठी आवाज दिल्याचंही नोंदवण्यात आलं.

पण, खराब हवामानामुळे बचावपथक वेळेवर पोहोचू शकलं नाही. अखेर, पावसाळी हवामान आणि मऊ वाळूसदृश जमिन यामुळे दोराच्या सहाय्याने देखील तिला बाहेर काढणं कठीण झालं.

जुलियाना पूर्णपणे अडकली होती. 6 बचाव पथके, दोन हेलिकॉप्टर, औद्योगिक ड्रिल्स आणि काही गाईडेड रॉयटिंग उपकरणांचा वापर तिच्या बचावासाठी केला गेला. पण हवामानामुळे थर्मल ड्रोनही वापरणे कठीण झाले.

24 जून 2025 रोजी तिचा मृतदेह तिला आढळून आला. कुटुंबाने स्पष्ट केले की जुलियाना अन्न, पाणी किंवा कपड्यांशिवाय तिथे अडककी होती.

माऊंट रिंजानी 3726 मीटर उंच

माऊंट रिंजानी हा 3726 मीटर उंच असलेला इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ज्वालामुखी आहे. तो पश्चिम नुसा तेंगारा प्रांतात, लोम्बोक बेटावर स्थित आहे, जे बालीपासून फेरीने सहज पोहोचण्याजोगं आहे.

या पर्वताचा पहिला नोंदवलेला उद्रेक 1847 मध्ये झाला होता. त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासह साहसी ट्रेकिंगसाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात.

ब्राझिल सरकारचा दुजोरा...

ब्राझिल सरकारने अधिकृत निवेदनात मारीन्सचा मृतदेह शोधण्यात आल्याच्या बातमीस दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिक प्रशासन, ट्रेकिंग एजन्सीज आणि पर्यटन व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT