Trump - Lula - Modi  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Lula refuses Trump call | ट्रम्प यांच्यापेक्षा मी नरेंद्र मोदींना कॉल करेन! ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला आक्रमक; ट्रम्प यांच्यावर पलटवार

Lula refuses Trump call | टॅरिफवरून तणावाबाबत लुला WTO मध्ये दाद मागणार; COP30 साठी ट्रम्पना निमंत्रण देणार, आले न आले तर त्यांची मर्जी...

Akshay Nirmale

ठळक मुद्दे-

  • अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयावर नाराजी व्यक्त करत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना कॉल न करण्याचा निर्णय घेतला.

  • लुला यांंनी पंतप्रधान मोदी व क्षी जिनपिंग यांना फोन करेन असे म्हटले आहे.

  • अमेरिका-ब्राझि तणाव असूनही लुला ट्रम्प यांना COP30 परिषदेसाठी आमंत्रण देणार आहेत.

Brazil presiden Lula refuses Trump call said he will call Narendra Modi instead

रियो डी जानेरियो : ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इनासिओ लुला द सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "कोणीही मला कॉल करू शकतो" या ऑफरवर स्पष्टपणे उत्तर दिले आहे. लुला म्हणाले की, ते ट्रम्पला कॉल करणार नाहीत, त्यापेक्षा ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॉल करतील. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनाही कॉल करेन असेही लुला म्हटले आहेत.

ट्रम्प यांनी अमेरिकेने ब्राझिलवर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे उद्भवलेल्या व्यापार तणावाला दूर करण्यासाठी लुला यांना कधीही फोन करून चर्चा करण्याची ऑफर दिली होती. मात्र, लुला यांनी ब्राझिलच्या हितासाठी जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि इतर संसाधने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅरिफ ही ब्राझिलच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना

ब्राझिलच्या परराष्ट्र धोरणावर बोलताना लुला म्हणाले, "मी ट्रम्प यांना कॉल करणार नाही, कारण ते बोलू इच्छित नाहीत. पण मी क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांना कॉल करेन. पुतिन यांना कॉल करणार नाही कारण ते सध्या प्रवास करू शकत नाहीत."

यावेळी त्यांनी ब्राझिल आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये सुरू असलेल्या तणावाला "एकदम दुर्दैवी" असे संबोधले. अमेरिकेने लावलेला टॅरिफ ही "ब्राझिलच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना" असल्याचे ते म्हणाले.

ब्राझील आणि BRICS

लुला यांनी सांगितले की, ब्राझिल आधीच इतर देशांसोबत, विशेषतः BRICS देशांशी व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. भारत, रशिया, चीन हे BRICS देश आहेत, जे अमेरिकेच्या डॉलरच्या दबावाला आव्हान देत आहेत. ट्रम्प यांनी BRICS धोरणांना पाठिंबा देणाऱ्या देशांवर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे.

COP30 चे आमंत्रण

तणाव असताना सुद्धा, लुला यांनी ट्रम्प यांना नोव्हेंबरमध्ये ब्राझिलच्या बीलेम येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषद COP30 मध्ये सहभागी होण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिले आहे.

लुला म्हणाले, मी ट्रम्प यांना COP30 मध्ये सहभागी होण्यासाठी नक्कीच कॉल करेन. जर ते येणार नसतील तर ती त्यांची आवड असेल. पण आम्ही नेहमीच आदर, मैत्री आणि लोकशाहीचा सन्मान ठेवू."

अमेरिकेची बाजू

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, "लुला मला कधीही कॉल करू शकतात. माझे ब्राझिलच्या लोकांवर प्रेम आहे, पण सध्याचे सरकार चुकीचे निर्णय घेत आहे.

ब्राझिलचे वित्त मंत्री फर्नांडो हद्दाद यांनी ट्रम्प यांच्या या विधानाचे स्वागत केले असून ते म्हणाले की, लुलाही ट्रम्प यांना कॉल करायला तयार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT