Boeing 737 MAX 8 fire
डेनवर : अमेरिकेतील डेनवर इंटरनॅशनल एअरपोर्टवर शनिवारी एका मोठ्या अपघाताचा धोका टळला. अमेरिकन एअरलाईन्सच्या बोइंग 737 मॅक्स 8 विमानाचे लँडिंग गिअर फेल झाले, त्यामुळे टेकऑफ थांबवण्यात आला. या दरम्यान विमानाच्या मागील भागाला आग लागली. ही फ्लाइट मायामीकडे निघाली होती.
ही घटना दुपारी 2:45 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 2:15) घडली. फ्लाईट AA‑3023 (बोइंग 737 MAX 8) ही Denver International Airport वरून मायामीसाठी 26 जुलै 2025 रोजी टेकऑफ दरम्यान लँडिंग गिअरच्या टायरमध्ये तांत्रिक समस्या जाणवली, ज्यामुळे आग लागली आणि उत्सर्जित धूर पसरला.
पायलटने तात्काळ टेकऑफ रद्द केला आणि आपत्कालीन प्रक्रियेची सुरुवात केली. सर्व 173 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सना इमर्जन्सी स्लायडरच्या माध्यमातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. 6 जण किरकोळ जखमी झाले, त्यापैकी एकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Denver Fire Department ने आग 5:10 pm पर्यंत पूर्णपणे विझवली, आणि हे Ground Stop लागू केल्यामुळे 87 फ्लाइट्स प्रभावित झाल्या, परंतु नंतर सर्व कार्य पुन्हा सामान्य झाले. प्रवाशांना मियामीसाठी दुसरे विमान दिले गेले.
FAA (फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन) आणि अमेरिकन एअरलाईन्सने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. एअरलाईन्सने सांगितले की, टायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे घडलं आणि त्यामुळे विमान तात्काळ सेवा बाहेर काढण्यात आलं आहे.
काही प्रवाशांनी स्लाइडरवरून खाली येताना लहान मुलांना हातात घेऊन धावताना व्हिडिओ शूट केला. एक प्रवासी घाईत स्लाइडरवरून खाली पडल्याचं देखील कॅमेऱ्यात कैद झालं. फायर डिपार्टमेंटने तात्काळ हस्तक्षेप करत आग विझवली. काही प्रवासी व्हिडिओमध्ये स्लायडर वरून पळताना, धूरात थांबतांना आणि फायर फ्लेम्स जवळून पळताना दिसतात.
2 ते 3 वाजेच्या दरम्यान एअरपोर्टवर ग्राउंड स्टॉप लागू केला गेला, ज्यामुळे 87 फ्लाइट्स प्रभावित झाल्या. प्रवाशांना मायामीसाठी नवीन विमान देण्यात आलं.सध्या एअरपोर्टवरील सर्व कामकाज सामान्यपणे सुरू आहे.
12 जून रोजी अहमदाबाद येथे बोइंग 787-8 विमान टेकऑफनंतर 2 मिनिटात कोसळले होते. यात 270 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याशिवाय मार्चमध्ये डेनवर एअरपोर्टवरच अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाने इंजिनच्या बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केली होती. तर साउथवेस्ट फ्लाइट 1496 ला मिड-एअर टक्कर टाळण्यासाठी अचानक नोज ड्रॉप करावं लागलं. यात प्रवासी सीटवरून उडून छताला आपटले.