Indian Tourist Boat Capsizes In Vietnam pudhari
आंतरराष्ट्रीय

Indian Tourist Boat Capsizes In Vietnam: व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली... १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

Anirudha Sankpal

Indian Tourist Boat Capsizes In Vietnam: व्हिएतनाममधील फु कोओक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घऊन जाणारी बोट उलटली आहे. स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत जवळपास १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. भारतीय दूतावासाने हेल्पलाईन कक्ष देखील सुरू केला आहे. बाधित कुटुंबीयांना मदत मिळावी आणि माहिती देण्यासाठी हो ची मिन्ह सिटी आणि हनोई इथं नियंत्रण कक्ष देखील सुरू करण्यात आला आहे.

या घटनेबाबत भारतीय दूतावासाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घटनेची पुष्टी केली आहे. दूतावास आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणते की, 'एक अत्यंत दुःखत घटनेत व्हिएतनाममधील फू क्वोक बेटाच्या जवळ काही भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटली आहे. हा दुर्घटनेची अचूक माहिती घेतली जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.

प्रभावित कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी हो ची मिन्ह सिटीमध्ये असलेल्या भारतीय दूतावासात एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तसेच लोकांना +84 36 281 7930, +84 91 552 37 14, +84 33 452 0414 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितलं आहे.

स्थानिक प्रशासनाने बोट पलटल्यानंतर लगेचच रेस्क्यु ऑपरेशन सुरू केलं होतं. पाण्यात बडुणाऱ्या लोकांना त्वरित बाहेर काढण्याचं काम सुरू केलं होतं. सध्या बचाव कार्य सुरू आहे. दूतावास परिस्थितीवर नजर ठेवून आहे. ही घटना कशी घडली याबाबत अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र खराब हवामान आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटीत भरल्यामुळं ही घटना घडली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तपास सुरू असून पर्यटक सुरक्षित असतील अशी प्रार्थना केली जात आहे.

youtube.com/watch?v=JzlAJIyrq6M

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT