Donald Trump Pudhari
आंतरराष्ट्रीय

Blockade in Strait of Hormuz:'होर्मुझ'वरुन युद्ध चिघळणार? इराणच्या बंदरांची नाकेबंदी, चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता

Donald Trump On Iran War: अमेरिकेतील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इराणने चर्चेची ऑफर दिल्याचा दावा केला आहे.

पुढारी डिजिटल टीम

Strait of Hormuz Blockade Us President Donald Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणविरोधात आक्रमक भूमिका घेतली. अमेरिकेच्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरूवात केली असून नाकेबंदीच्या जवळ येणारी कोणतीही जहाजे तात्काळ नष्ट केली जातील, असा इशाराच ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ट्रम्प यांनी इराणने चर्चेची ऑफर दिल्याचा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळपासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणार, असा इशारा दिला होता. यानुसार संध्याकाळी अमेरिकेच्या नौदलाने इराणच्या नाकेबंदीला सुरूवात केली. नाकेबंदीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या 90 मिनिटांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी इराणला इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले, इराणचे नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्याकडे काही लहान जहाजे आहेत पण आमच्यासाठी त्या धोकादायक नाहीत. या जहाजांपैकी कोणतेही जहाज आमच्या युद्धनौकांच्या जवळ आले तर समुद्रातील अमली पदार्थ तस्करांविरोधात वापरल्या जाणाऱ्या प्रणालीप्रमाणे त्यांचा तात्काळ नायनाट केला जाईल. ही कारवाई जलद आणि कठोर असेल.

एकीकडे हा इशारा देतानाच ट्रम्प यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना इराणने चर्चेचा प्रस्ताव दिल्याचा दावाही केला. मात्र, या वृत्ताला इराणकडून दुजोरा मिळालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT