Bhutan Glacial Lake Outburst pudhari
आंतरराष्ट्रीय

Bhutan Glacial Lake Outburst: भूटानमध्ये बर्फाच्छादीत तलाव फुटला... भारतालाही फ्लॅश फ्लडची वॉर्निंग; जाणून घ्या नेमकं काय झालं

भूटान सीमाभागासह पश्चिम बंगाल आणि आसाम या भारतातील दोन राज्यांना देखील इशारा देण्यात आला आहे.

Anirudha Sankpal

Bhutan Glacial Lake Outburst: भूटानच्या उत्तर पश्चिम भागातील एक बर्फाचा तलाव फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रशासनाने फ्लॅश फ्लडचा इशारा दिला असून भारत भूटान सीमाभागासह पश्चिम बंगाल आणि आसाम या भारतातील दोन राज्यांना देखील इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भूटान प्रशासनाने त्वरित लोकांना तेथून बाहेर काढलं त्यामुळं कोत्याही जिवीत हानीचे वृत्त नाही. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभाग हा हाय अलर्टवर आहे. कारण या तलावातील पाणी आणि गाळ हा हिमालयातील नद्यांच्या माध्यमातून पुढे सरकत आहे.

नेमकं काय झालं?

गुरूवारी सायंकाळी अचानक बर्फाळ तलाव फुटला. त्यामुळं शिंताफू तलावात पूर आला. हा तलाव भूटानमधील गासा जिल्ह्यातील मो चू नदी पात्रात उंचावर आहे. यात मोठ्या प्रमाणात अचानक पूराचं पाणी आणि गाळ आल्यानंतर मोचू नदीचे पात्र फुगले.

शिंताफू तलाव हा भूटानमधील १७ अत्यंत धोकादायक तलावांपैकी एक बर्फाचा तलाव आहे. शुक्रवारी सकाळी हे पुराचं पाणी काबेसा गेवोग येथील श्रीगांग इथंपर्यंत पोहचलं होतं. हे ठिकाण ऐतिहासिक पुनाखा डझाँगपासून फक्त ८ किलोमीटर लांब आहे.

भूटानवर काय प्रभाव पडला?

अचानक आलेल्या या पूरामुळे गासा तश्चू मधील अनेक ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच प्रसिद्ध नैसर्गिक गरम पाण्याचा कुंड देखील वाहून गेला आहे. गासा यापूर्वी देखील २६ ऑगस्ट २०२१ च्या अशाच प्रकारे आलेल्या फ्लॅश फ्लडमध्ये पूर्णपणे वाहून गेले होते.

मात्र या नैसर्गिक संकटाची आधीच पूर्वकल्पना आल्यानं अन् वेळीच इशारा दिल्यानं या गरम गुंडाच्या जवळली सर्व लोकाना हटवण्यात आलं होतं. त्यामुळं जीवित हाणी टळली आहे. मात्र स्थानिक लोकांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणारा पुनाखा येथील सोलर इरिगेशन लिफ्टिंग सिस्टमचे काही प्रमाणात नुकासन झालं आहे. त्याचबरोबर पुराच्या पाण्यातून वाहून आलेला चिखल अन् दगड हे पुनाखा गासा महामार्गावर पसरला आहे. त्यामुळे स्थानिक दळण वळण बाधित झालं आहे.

भारताला देखील अलर्ट

मो चू ही नदी भूटानच्या दक्षिण भागातून वाहते. पुढे ती पुनतसांगचू मधील फू चू ला मिळते. त्यानंतर ती भारतात प्रवेश करते. भारतात ती सानकोश नदीत रूपांतरित होते. पुढे ही नदी ब्रम्हपुत्रामध्ये येऊन मिळते.

या घटनेनंतर भूटानने त्वरित भारतीय प्रशासनाला अलर्ट केल. तुमच्या इकडे देखील पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते असा इशारा दिला आहे. त्यानंतर भूटानला लागू असलेल्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

आसाम मधील धुबरी जिल्ह्यात पाण्याचा स्तर वाढतो का याकडे सतत लक्ष दिलं जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या डोंगराळ भागात, अलीपूरदूआर आणि जलपैगुरी जिल्ह्यांना देखील पुराचा इशारा दिला आहे. कूच बिहार भागातील प्रशासनाने सोनकोश नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT